मुंबई, (प्रतिनिधी) : भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 8 गोरेगाव (पूर्व) मुंबई येथे रविवारी ( ता.14) विवीध कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाली. सकाळी दहा वाजता तथागत भगवान बुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामुहिक वंदना करून अभिवादन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक संपत कांबळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून समादेशक सहाय्यक श्री पी. एस. कदम साहेब, श्री एल.एस.आतकरी ( सहायक समादेशक) निवृत्त पोलीस निरीक्षक मधुकर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. सायंकाळी सहा वाजता भव्य दिव्य मिरवणुक संपन्न झाली.यामध्ये साई स्वर महिला लेझीम पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. भोजनाच्या कार्यक्रमानंतर पवई डान्स किलर्स ग्रुपच्या वतीने भीम गीत, लोकगीत व समाज प्रबोधनात्मक विवीध संगीतमय ऑर्केस्ट्रा सादर करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय रायबोले यांनी केले तर आभार सहायक पोलीस उपनिरीक्षक कैलास पवार यांनी केले. ...