*कुणबी कृती समिती, महाराष्ट्र राज्य यांची औरंगाबाद येथील मिटिंग यशस्वी संपन्न..* *समाजिक संघटनांचे फेडरेशन लवकरच अस्तित्वात येणार..* औरंगाबाद: एक समाज एक विचार, एक विझन, एक फेडरेशन निर्माण व्हावे म्हणून “ महाराष्ट्र राज्य कृती समितीचे गठन तीन वर्षापूर्वी गोंदिया येथे करण्यात आले. आजमितीस कृती समितीचे संपूर्ण महाराष्ट्रभर कार्य सुरु असून कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश अशा विविध विभागातील सामाजिक संघटना एकत्रितपणे कार्यरत आहेत. ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत जनजागृती तसेच राज्यभरातील सर्व संघटना एकत्र येवून वैचारिक परिवर्तन करावे तसेच शैक्षणिक, आर्थिक, उद्योग व्यवसाय मध्ये प्रगती साधावी म्हणून कृती समितीचे गठन करण्यात आले आहे. गेली तीन वर्ष सातत्याने समितीच्या वैचारिक मिटिंग होत असून *रविवार दि. ९ जून २०१९ रोजी, पालखी हॉटेल, सिडको, औरंगाबाद येथे पार पडली. मिटींगला समितीचे सदस्य अँड. राम कुऱ्हाडे आणि सहकारी यांनी सदर मिटिंगचे आयोजन केले होते.* मिटिंगसाठी संतोष भाऊ दिंडे , योगेश चव्हाण सर, प्रा .घोडके सर, कुमार सुरवसे, भागवत घाटे, शेषनारायण जण्ढे, ...