*गावरान चवी सह मांसल प्रथिनांची वाढती मागणी लक्षात घेता ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना देशी जातीच्या परसातील कुक्कुट पालनास भरपूर वाव असून देशी जातीच्या कुक्कुट पालनातून स्वतःचा विकास करणे ही काळाची गरज आहे* असे प्रतिपादन मा. श्री श्रीनिवासजी मुंडे सभापती कृषी , पशुसंवर्धन व दुगधशाळा समिती जिल्हा परिषद परभणी तथा सदस्य, जिल्हा नियोजन समिती परभणी यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागा मार्फत 'परसातील कुक्कुट पालनास चालना देणे' या योजने अंतर्गत गंगाखेड तालुक्यातून दारिद्र्य रेषेखालील, मागासवर्गीय, बचत गट, महिला पुरुष असे एकूण 393 लाभार्थीची निवड करून त्यांना 3 टप्प्यात एकूण 45 देशी विकसित जातीचे 4 आठवडे वयाची कुक्कुट पक्षी 100% अनुदानावर वाटप करणे' या योजने अंतर्गत आज मौजे बोर्डा येथील 74 लाभार्थींना दुसरा व तिसरा टप्प्यातील सातपुडा या देशी जातीचे कुक्कुट पक्षी एकूण 25 प्रति लाभार्थीस वाटप मा. *श्री श्रीनिवासजी मुंडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.* सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ संजय पुराणिक पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती गंग...