मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राणीसावरगाव ते गौळवाडी रस्त्याचे डांबरीकरण करा - उद्योजक महादेव मुसळे

राणीसावरगाव ते गौळवाडी रस्त्याचे डांबरीकरण करा - उद्योजक महादेव मुसळे राणीसावरगाव (प्रतिनिधी) गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव ते गौळवाडी रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून तात्काळ रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी आमदार रत्नाकर गुट्टे यांची भेट घेऊन उद्योजक महादेव मुसळे यांनी केली आहे राणीसावरगाव जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत गौळवाडी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योजक महादेव मुसळे यांनी पुढाकार घेतला असून यापुढे गावाच्या विकासासाठी लागेल तो निधी उपलब्ध करून देणार असल्याचे माध्यमाशी बोलताना सांगितले गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांची भेट घेऊन राणीसावरगाव ते गौळवाडी रस्त्याचे डांबरीकरण व इतर समस्येवर सविस्तर चर्चा करण्यात आली चर्चेनंतर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन आमदार रत्नाकर गुट्टे यांनी दिले असल्याचे उद्योजक महादेव मुसळे यांनी सांगितले आहे त्यांच्यासमवेत युवा नेते शिवाजी दहीफळे उपस्थित होते