■ विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात फाईन आर्ट या विद्याशाखेत एकाही विद्यार्थ्याला पीएच.डी. मिळालेली नाही. ■ १७६ पीएच.डी.धारक विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक प्रमाणपत्रांचे वितरण
■ विधि विद्याशाखेत एकमेव संशोधक विद्यार्थी आनंद देशमुख यांना पीएच.डी.पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ५६ वा वार्षिक दीक्षांत समारंभ रविवारी झाला. पदवी घेण्यासाठी विद्यापीठाकडे नोंदणी केलेल्या १३ हजार २00 पैकी जवळपास १0 हजार पदवीधरांनी आज रविवारी सायंकाळपर्यंत प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवी घेतली. तथापि, मुख्य समारंभात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पीएच.डी.धारक १७६ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या नाट्यगृहात दीक्षांत समारंभ झाला. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून नॅकचे संचालक डॉ. धीरेंद्रपाल सिंग उपस्थित होते. दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पीएच.डी.धारक विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यामध्ये विविध नऊ विद्याशाखांच्या १७६ पीएच.डी. प्राप्त विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचे समारंभपूर्वक वितरण करण्यात आले. त्यानंतर परीक्षा भवनमध्ये उर्वरित पदवी व पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. नोंदणी केलेल्या १३ हजार २00 विद्यार्थ्यांपैकी सुमारे १0 हजार विद्यार्थ्यांनी दीक्षांत समारंभानंतर दिवसभर प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवी घेतली. यासाठी परीक्षा भवनात ३३ काऊंटर सुरू करण्यात आले होते. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
अभियांत्रिकी विद्याशाखेत सर्वाधिक ९९ टक्के विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पदवी घेण्यासाठी उपस्थिती नोंदविली, असे उपकुलसचिव डॉ. दिगंबर नेटके यांनी सांगितले.
टिप्पण्या