मुख्य सामग्रीवर वगळा

राणीसावरगावसाठी खा.बंडू जाधव ' साहेबांनी ' काय केलय. . . .

महासंवाद न्युज :- परभणी जिल्हय़ातील राणीसावरगाव येथील श्री रेणुकादेवी तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी तिर्थक्षेत्र विकास निधीतून एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.यासाठी खा.संजय(बंडू) जाधव यांनी सर्वतोपरी प्रयत्न करून हा निधी खेचून आणला आहे .राणीसावरगाव येथील ग्रामपंचायत सरपंच प्रा.पि.एल राठोड, उपसरपंच भूषण गळाकाटू यांच्या सह सदस्य व राणीसावरगाव विकास आघाडीचे मधूकर जाधव,सय्यद अल्ताफ,नारायण जाधव,औंकार आंधळे,रमेश  कुलकर्णी,महारूद्र बेंबळगे,दगडूआप्पा धूळे,सदस्य धनंजय जाधव, सुरेश चव्हाण, श्रीरंग जाधव, बाळासाहेब भिमनपल्लेवार, सोमनाथ कुदमुळे,बसलिंग चलोदे, मैनू तांबोळी,आदींनी निधी उपलब्ध व्हावा म्हणून वेळ पाठपुरावा केला होता. मात्र खा.संजय ( बंडू ) जाधव यांनी सर्वतोपरी प्रयत्न करून निधी मंजूर करून घेतला आहे याबद्दल जनतेने आभार मानले आहेत.

टिप्पण्या