मुख्य सामग्रीवर वगळा

परभणीत रामनवमीनिमित्त पोलीसांनी काय केलय.?

महासंवाद विशेष प्रतिनिधी परभणी :
रामनवमी निमित्त परभणीत आयोजीत शोभायात्रेत सुशोभित झालेल्या बुलेट वर नटलेल्या महिला सहभागी होणार होत्या. पण पोलीसांनी परवानगी नाकारल्यानं या महिलांसह संयोजकांचा चांगलाच हिरमोड झालाय. या शोभायात्रेत बुलेटचालक महिलांना सहभागी होवू द्यावं, यासाठी संयोजकांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडं धाव घेतलीय. दरम्यान, शोभायात्रेत महिलांच्या सहभागाला पोलीसांचा विरोध नाही तर वाहनांच्या सहभागाला प्रतिबंध असल्याची माहिती पोलीस निरीक्षक घोरबांड यांनी 'माध्यमाशी ' बोलताना दिलीय.
रामनवमीनिमित्त आज दिनांक १५ एप्रिल रोजी सायंकाळी एका भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय. या शोभायात्रेत विविध सांस्कृतीक देखावे सादर केले जाणार आहेत. विविध सजिव देखांव्यांसह शहरातील २१ महिला सजवलेल्या बुलेटवरून या शोभायात्रेत सहभागी होणार होत्या. नऊवारी नेसून मराठमोळ्या साजशृंगारात असलेल्या या महिला या शोभायात्रेचं खास आकर्षण ठरणार होत्या. त्या दृष्टीनं परभणीतील राॅयल ईनफिल्डची वितरण व्यवस्था पाहणारे चंद्रलामा आटोमोटिव्हचे प्रविण मुदगलकर तयारीलाही लागले होते. शोभायात्रेत अग्रभागी राहणाऱ्या बुलेट गाडीस खास पद्धतीनं सजवण्यात आलेलं होतं. तसंच बुलेट चालवू शकणाऱ्या महिलांची बुलेट चालवण्याची ट्रायल घेवून त्यांचे वाहन चालवण्याचे परवानेही जमा करून घेण्यात आले. ही संपुर्ण तयारी पुर्ण झाली असतानाच नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी संयोजकांना शोभायात्रेतील महिलांच्या बुलेट रॅलीस परवानगी नसल्याचं सांगीतलं. या ऊपरही बुलेटसह शोभायात्रा निघाली तर सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असा ईशाराच घोरबांड यांनी दिला. यामुळं बुलेटसह शोभायात्रेत सहभागी होवू ईच्छिणाऱ्या महिला आणि संयोजकांची चांगलीच नाराजी झालीय. या शोभायात्रेत किमान पाच तरी महिलांना बुलेटसह शोभायात्रेत सहभागी होता यावं, या साठी आपण पोलीस अधिक्षक नियती ठाकर यांची भेट घेणार असल्याची माहिती संयोजन समितीचे रितेश जैन यांनी दिलीय.या नंतर  ऐनवेळी पाच महिलांना सहभागी होण्यासाठी परवानगी दिली असल्याचे सांगितले आहे. 
या संदर्भात पोलीस निरीक्षक घोरबांड यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. आपल्या हद्दीत केणत्याही प्रकारच्या वाहनांच्या रॅलीस परवानगी नसल्याचं त्यांनी सांगीतलं. कांही दिवसांपूर्वी निघालेल्या एका रॅलीमुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळं खबरदारीचा उपाय म्हणून ही परवानगी नाकारण्यात आल्याचं त्यांनी सांगीतलंय. कांही मोठ्या शहरांमध्ये शोभायात्रांमध्ये बुलेट चालवत महिला सहभागी होतात याकडं त्यांचं लक्ष वेधलं असता त्या त्या ठिकाणची परिस्थिती वेगवेगळी असल्याचं पोलीस निरीक्षक घोरबांड यांनी सांगीतलं. पोलीस प्रशासनाच्या या अजब वृत्तीबाबत रामभक्त आणि शहरवासीयांत संताप व्यक्त केला जातोय.

टिप्पण्या