महासंवाद न्युज :-औरंगाबादमध्ये हेल्मेट सक्तीनंतर त्या ठिकाणी हेल्मेटचा मोठय़ा प्रमाणात तुटवडा पडला होता. त्या पार्श्वभूमीवर नांदेडातील अनेक व्यापार्यांनी दिल्ली, हैद्राबाद येथून यापूर्वीच हेल्मेटचा साठा करुन ठेवला होता. आयएसआय मार्क असलेले कंपनीचे हेल्मेट १२00 ते १५00 रुपयापर्यंत आहे. त्याचबरोबर ४00 रुपयांनाही हेल्मेट बाजारात मिळत होते. याबाबत नांदेड टू व्हिलर अँन्ड थ्री व्हिलर अँटोमोबाईल असोसिएशनचे अध्यक्ष प्रेमकुमार फेरवाणी म्हणाले, बाहेर राज्यातून अनेक जण २५0 रुपयांना हेल्मेट आणून नांदेडात ते ४00 रुपयांना विक्री करीत आहेत. ते मनपाला त्याबाबत कुठलाही कर देत नाहीत. यामुळे नांदेडातील व्यापार्यांचे नुकसान होत असून आयएसआय मार्कचे बोगस हेल्मेट विक्री होत आहे. आम्हाला तर माहितच नाही
४/वजिराबाद ठाण्यासमोर एका शेतकर्याला पोलिसांनी अडविल्यानंतर अहो हेल्मेट आजपासून घालायचे आहे हे मला माहितच नाही असा प्रश्न केला. त्यावर पोलिसांनी मामा शंभरचा दंड फाडा मग सगळं माहित होईल...असे म्हणून कर्मचार्याने त्यांच्या हातात दंडाची पावती दिली. पहिल्या दिवशी २८0 वाहनधारकांनावर कारवाई
४/हेल्मेट सक्ती अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी शहर वाहतुक शाखेच्या कर्मचार्यांनी वजिराबाद पोलिस ठाण्यासमोरील पॉईंटवर तब्बल २८0 वाहनधारकांवर कारवाई केली. सध्या अनेक कर्मचारी पोलिस भरतीत असल्यामुळे ही मोहिम प्रभावीपणे राबविण्यात अडचण येत आहे. परंतु हेल्मेटसक्ती ही सुरुच राहणार असून नागरिकांनीही हेल्मेटचा वापर करावा असे आवाहन शहर वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक नारनवरे यांनी केले. नांदेड : परिक्षांचा काळ आणि बाजारात हेल्मेट उपलब्ध नसल्याच्या कारणावरुन पंधरा दिवसांची मुदतवाढ दिल्यानंतर १ एप्रिलपासून नांदेड शहरात हेल्मेट सक्तीला सुरवात करण्यात आली. सकाळी घराबाहेर पडलेल्या वाहनधारकांना अडवून पोलिसांनी दंडाचा बडगा उगारताच दिवसभर शहरात हेल्मेट मिळविण्यासाठी वाहनधारकांची धावपळ सुरु होती. सकाळ आणि सायंकाळ अशा दोन सत्रात शहरात ठिकठिकाणी तपासणी मोहिम राबविण्यात आली.
औरंगाबाद शहरात १ मार्चपासून लागू करण्यात आलेल्या हेल्मेट सक्तीचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर नांदेडातही हेल्मेट सक्तीचे आदेश काढण्यात आले होते. परंतु मध्यंतरी विद्यार्थ्यांच्या परिक्षांचा काळ आणि बाजारपेठेत हेल्मेट उपलब्ध नसल्याच्या कारणारुन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी हेल्मेट सक्तीसाठी मुदतवाढ दिली होती. तसेच ही हेल्मेटसक्ती नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजेच १ एप्रिलपासून लागू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.
त्यानुसार, शुक्रवारी सकाळी वजिराबाद पोलिस ठाण्याच्या समोर वाहतुक शाखेच्या कर्मचार्यांसह जलद प्रतिसाद पथकातील कर्मचारीही हेल्मेट नसलेल्या वाहनधारकांना अडवून दंड फाडत होते. यावेळी काही ठिकाणी कर्मचारी आणि वाहनधारकांमध्ये वादही झाले. या प्रकारात काही वेळ मोहिम थांबलीही होती.
त्यानंतर सायंकाळी पुन्हा एकदा
वजिराबाद ठाण्यासमोरच हेल्मेट नसलेल्या वाहनधारकांना १00 रुपये दंड फाडावा लागला. हेल्मेटसक्तीमुळे दुचाकीस्वारांनी शहरात मिळेल त्या ठिकाणाहून हेल्मेटची खरेदी केली. त्यात इतर राज्यातील अनेक व्यापार्यांनी मुख्य रस्त्यासह वजिराबाद ठाण्यासमोरच हेल्मेटचे दुकान थाटले होते
टिप्पण्या