राणीसावरगाव (प्रतिनिधी ) धर्म घरा पुरता मर्यादित असावा.तो रस्त्यावर येऊ नये.जर रस्त्यावर आला तर त्याला धर्म म्हणत नाहीत.धर्मला घरापुरते मर्यादित ठेवून सर्व धर्म व समाजाचे समतोल राखण्याचे कार्य पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकरांनी केल्याचे मत प्राचार्य डॉ शिवाजी दळणर यांनी व्यक्त केले.
राणीसावरगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा 191 वा स्मृती दिन साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ शिवाजी दळणर हे उपस्थित होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. तुकाराम बोबडे, प्रकाश नानोर,डॉ उत्तम देवकते हेउपस्थित होते. पुढे बोलताना प्रा दळणर म्हणाले, भारताच्या इतिहासात पहिली परिवर्तनवादी महिला म्हणून अहिल्यादेवी यांच्या कडे पाहिले तर ते वावगे ठरणार नाही.कारण स्वताच्या मुलीचा विवाह एका अदिवाशी युवकाशी करून दिला. समाज कल्याणाबरोरच राज्याचे हित जोपासणारी राज्यकर्ती म्हणुन अहिल्यादेवी याची ओळख आहे. असे मत व्यक्त केले.या प्रसंगी प्रा बोबडे म्हणाले,महान व्यक्तींना त्याच्या कार्याने ओळखले जावे.चमत्काराने नाही.असे मत व्यक्त केले.नानोर यांनी अहिल्यादेवी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तर विद्यार्थिनी पल्लवी कदम,विद्या कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा गणेश माने तर सुत्रसंचलन कुमुदिनी कांबळे तर आभार प्रा पुजारी यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक , कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या