मुख्य सामग्रीवर वगळा

औरंगजेबाच्या औलादीना सडेतोड उत्तर देण्याची गरज :- डाॅ.तोगडीया

राणीसावरगाव :- या देशातील शेतकरी सम्रध्द होता त्यामुळे तो शेतीतील होणारे उत्पन्न बारा बलूतेदारांना वाटून उर्वरित धान्य आपल्या कुटुंबातील व्यक्तीसाठी नेणारा शेतकरी राजा या देशातला आहे रासायनिक खते, औषधांच्या वापरामुळे शेतकरी राजावर वाईट दिवस आले आहेत. शेतकऱ्याचां विकास साधायचा असेल तर जैविक शेतीचा वापर करावा त्यानंतरही शेतकऱ्याना लूटण्यासाठी बसलेल्या औरंगजेबाच्या औलादीना सडेतोड उत्तर देण्याची गरज असल्याचे मत विश्व हिंदू परिषदेचे अंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.प्रविण तोगडीया यांनी दि.16 ऑगष्ट रोजी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना केले .
यावेळी व्यासपिठावर होळकर महाविद्याल्याचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव दळणर हे उपस्थित होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र गोरक्षक प्रमुख लक्ष्मीनारायण चांडक, संजयआप्पा बारगजे, लक्ष्मीकांत क्षिरसागर,राजू भांबरे , नारायण महाराज पालमकर, प्रल्हाद कानडे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना म्हणाले की, शेतकऱ्याला कमी खर्चात जास्त उत्पादन मिळाले पाहिजे त्यासाठी गायीचे शेनखत व मुत्रापासून तयार करण्यात आलेली खत,औषधे यांचे वापर केल्यास कमी खर्चात जास्त उत्पादन मिळेल. शेतकऱ्यानी उत्पादीत केलेल्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी राजाचा विकास खूटला आहे त्यामुळे एकेकाळी त्रिशूल वाटणारे तोगडीया आता शेतकऱ्याना गांडूळ वाटप करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे राणीसावरगाव मध्ये सुद्धा गांडूळ शेती उत्पादनासाठी गांडूळ बॅक उभारण्यात येणार आहे असे ते म्हणाले पांगरी येथे विहिपच्या शाखेचे  उद्घाटन करून टाकळवाडी येथील गळाटी नदीवर स्वर्गीय अशोकजी सिघल बंधाऱ्याचे जलपुजन केले. यावेळी शामची आई गोशाळाचे उदघाटन त्याच्या       हस्ते करण्यात आले  कार्यक्रमाचे आयोजन विश्व हिंदू परिषदेचे प्रांत संयोजक शिवप्रसाद कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली , सतोष गाडे, निव्रती भिमनपल्लेवार, विलास जाधव, निळकंठ स्वामी , वामन जाधव, निजलिंग मंगलगे, नंदु धनमने , सतोष पुजारी, कैलास जाधव, अतुल बेबळगे , तेजस जाधव, परसराम जाधव, दत्ता जाधव, आदींनी केले आहे या वेळी सुरक्षेच्या द्रष्ट्या मोठा  पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टिप्पण्या