मुख्य सामग्रीवर वगळा

चोरट्यांचा मृत्यूशी संघर्ष

परभणी:- जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात असना-या कासापुरी गावात सोमवारी चोरटे बिएसएनएल टॉवर मधून बॅट-या चोरून नेत असतांना याचा सूगावा कासापुरी ग्रामस्थांना लागताच गावा पासून एक किमी अंतरावर असलेल्या या टॉवरच्या चारी बाजूंनी ग्रामंस्थांनी नाका बंदी केल्याने पळून जात असलेले ४ चोरटे कठडा नसलेल्या ६०-७०विहीरीत पडल्याने त्यांनी अडीच तास कपारीला धरून अडीच तास जिवन मरणाशी संघर्ष केला शेवटी पेलीसांनी ग्रामस्थांच्या मदतीने हे चोरटे जेरबंद केले.
परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात असलेल्या कासापूरी या गावात बिएसएनल चा टॉवर असून या टॉवर चे मागील महीना भरापूर्वी अर्धे केबल चोरीला गेले होते.त्या मुळे हे टॉवर बंद होते सोमवार ५ सप्टेबर रोजी मध्य रात्री बारा-साडेबाराच्या सुमारास गावा पासून एक किमी अंतरावर असलेल्या जायकवाडी च्या ४७ क्रमांकाच्या वितरीके शेजारील या टॉवर जवळ असलेल्या इलेक्ट्रॉनिक बॅट-या चोरन्या साठी चोरटे अॅटोरिक्षा घेऊन आले होते . या वेळी या चोरट्यानी त्या ठिकाणी असलेल्या काही बॅट-या काढून बाहेर ठेवत असतांनाच या ठिकाणी रखवालदार म्हणून काम पहाणारे लक्षमण भाग्यवंत यांना कसलातरी आवाज आल्याने त्यांना शंका आली आणि त्यांनी कासापुरी गावात फोन केला या दिवशी गणेशाची स्थापणा होत असल्याने गावातील मंडळी जागीच होती त्यांनी तात्काळ मोटारसायकल वरून टॉवरच्या दिशेने कुच केली या वेळी चारी बाजूंनी ग्रामस्थांनी या टॉवरला वेढा दिला असल्याचे चोरट्यांच्या लक्षात आले त्यामुळे हे चोरटे कंपाऊंड मधून पूर्वेकडून ऊड्या हाणून दक्षीन भागाकडे पळत सूटले. या वेळी अंधारात पळत असतांना कठडे नसलेल्या ६०-७० फुट विहिरीत हे चार चोरटे पडले विहीरीत आठ दहा फुट पाणी असल्याने त्यांना किरकोळ मारलागून जखमी झाले. या वेळी या चोरट्यांनी विहीरीतील कपारींना धरून आपला जीव वाचवला या वेळी ग्रामस्थांनी या घटनेची माहिती पाथरी पोलीसांना दिली.या वेळी पोलिस उपनिरिक्षक जी.एस लेंगूळे,स पो उपनिरिक्षक कालापाड, पोना माने, पोकॉ शिंदे हे घटना स्थळी दाखल झाले.पहाटे तीन च्या सुमारास काळी बनियान आणि चड्डी परीधान केलेल्या २० ते २५ शीत ल्या या चार चोरट्यांना पाथरी पोलीसांनी कासापूरी ग्रामस्थांच्या मदतीने तिघांना वर चढता येत नसल्याने बांधून वर काढले तर एक चोरटा दोरीला धरून स्वत: वर आला यात या चोरट्यांची नावे अमजद खान माजीद खान पठाण रा.मानवत .सय्यद समंदर सय्यद सिकंदर. शेख मोबीन शे शकील रा. परभणी शेख सोहेल शेख फरीद रा परभणी अशी नावे आहेत

टिप्पण्या