मुख्य सामग्रीवर वगळा

खंडाळी जिल्हा परिषद निवडणूक व्यंकटराव पाटील लढवणार

खंडाळी जिल्हा परिषद निवडणूक व्यंकटराव पाटील लढवणार
**************************
अहमदपूर ( प्रतिनिधी )
लातूर जिल्हा परिषद,खंडाळी जिल्हा परिषद गटामधून व्यंकटराव पाटील निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार विनायकरावजी पाटील यांचे खंदे समर्थक आहेत त्यामुळे त्यांना मोठी ताकद त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल यात शंका नाही .तसे पहाता व्यंकटराव पाटील हे खंडाळी ग्रामपंचायतचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी,खंडाळी चे विद्यमान चेअरमन आहेत.ते सरपंच असताना खंडाळीच्या विकासाची कामे केली आहेत.यामध्ये खंडाळी हे गाव ८००० लोकसंख्येचे गाव असुनही गावामधील लोकांना गेली  ५० वर्षापासुन दैनंदीन पाण्यासाठी भटकंती करावी लागायची.वाटर सप्लायची कसल्याही प्रकारची व्यवस्था नव्हती. पण व्यंकटराव पाटील खंडाळी गावचे सरपंच झाल्यावर शासन व प्रशासन दरबारी वाटर सप्लायची मागणी धरून प्रयत्नाने खंडाळी गावाला नळ योजनेच्या माध्यमातून दि.०१ जानेवारी २०१६ पासुन गावाला नियमीत पाणीपुरवठा सुरू केला.त्या मुळे आज खंडाळी गावामधील सर्वसामान्य जनतेत समाधान दिसून येत आहे व. ग्रामपंचायत कार्यालयाला त्या माध्यमातून निधी मिळून दिला आहे .एवढ्या मोठ्या लोक संख्येचे गाव असुनही खंडाळी गावाला प्राथमीक अरोग्य केंद्राची अजुनही व्यवस्था नाही आहे.त्यामुळे गावामधील सर्वसामन्य लोकांना अहमदपुर ला जावे लागते.प्राथमीक अरोग्य केंद्राची गरज लक्षात घेऊन श्री.व्यंकटराव पाटील व आमदार विनायकरावजी पाटील यांनी शासन दरबारी मंजुरी साठी प्रयत्न करत आहेत.अशी अनेक विकासाची  कामे  करण्यासाठी व विविध प्रश्नाची सोडवणुक करण्यासाठी खंडाळी जिल्हा परिषद गटामधील गावांच्या लोकांची  श्री.व्यंकटराव पाटील यांनी येणारी जिल्हा परिषद निवडणूक लढवून खंडाळी जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व करावे अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे.

टिप्पण्या