गंगाखेड विकासासाठी १०० कोटी रु. देणार - मा.ना.बबनरावजी लोणीकर
*************************************
गंगाखेड { प्रतिनिधी } नगरपालिका निवडणुकीत उभा राहणार असलेल्या नगर परिषद उमेदवाराच्या मुखालती घेण्यात आल्या याप्रसंगी बोलताना मा.ना बबनराव लोणीकर म्हणाले की आमचे सरकार दुष्काळामुळे जास्त पैसे देऊ शकले नाही पुढील काळात गंगाखेड शहरासाठी ४० कोटी रु.पुर्ण शहरासाठी पाणीपुरवठा योजनेसाठी देणार व योजना गंगाखेड शहरापासुन सुरुवात करणार.गंगाखेड शहरातील अनूसुचित जाती प्रवर्गाती कुटुंबाला घरकुल योजना ४५३ घरची मंजुरी आहे त्यापैकी घरकुल बांधकाम सुरु आहे ह्या घरकुल मध्ये जास्त वाढ करण्यात येईल.गंगाखेड शहरातील दलित/ मुस्लीम बांधवांना पंतप्रधान घरकुल आवास योजना मधुन पक्के घरे देणार.पुढील काळात गंगाखेड शहरासाठी दलीत बांधवांना व मुस्लिम बांधवांना पतप्रधांन आवास घरकुल योजना महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येईल हि योजना लवकरच आपल्या गंगाखेड मध्ये सुरू करणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. यावेळी गंगाखेड येथे बेटी बचाव बेटी पढाव ह्या कार्यालयचे उद्घाटन मा.ना.बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी गंगाखेड शहरातील मुस्लिम बांधवांनी भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला असे मा. नगराध्यक्ष रामप्रभूजी मुंढे यांनीसांगितले.
टिप्पण्या