लवकरचं अॅटमगिरी प्रेक्षकांच्या भेटीला येणार...!
*************************************
मुंबई (प्रतिनिधी) दिग्दर्शक प्रदीप टोणगे यांनी दिग्दर्शित केलेला अॅटमगिरी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असल्याचे सहाय्यक दिग्दर्शक अमर चाकोतकर यांनी महासंवाद न्युज शी बोलताना सांगितले. यावेळी पुढे बोलताना म्हणाले की या चित्रपटात प्रमुख भूमिका राष्ट्रीय पुरस्कार विजेता हंसराज जगताप व फॅन्ट्री फेम राजश्री खरात हे दिसणार आहेत तर नविन चेहरा म्हणून धनश्री मेश्राम दिसणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असा विश्वास व्यक्त केला आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रदीप टोणगे,मंगेश शेंडगे व मुख्य सहाय्यक दिग्दर्शक विठ्ठल गौड यांनी केले आहे. विशेष म्हणजे परभणी जिल्हय़ातील राणीसावरगावचे अमर चाकोतकर हा तरूण चित्रपट क्षेत्रात आपले नशिब अजमावत आहे. त्यानी या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून अमर चाकोतकर यांनी काम केले आहे.इतर चार चित्रपटात काम केले आहे ते लवकरच अभिनयात पदार्पण करणार आहेत.
टिप्पण्या