मुख्य सामग्रीवर वगळा

गावात मतदान केंद्र दया अन्यथा मतदानावर बहिष्कार.. ग्रामस्थाचा इशारा

गावात मतदान केंद्र दया अन्यथा मतदानावर बहिष्कार.. ग्रामस्थाचा इशारा
********************************
जळकोट / प्रतिनीधी ज्ञानेश हलगरे
जळकोट तालुक्यातील धनगरवाडी  येथील मतदारांना ४ कि.मी अंतरावरील सोनवळा येथे जावुन मतदान करावे लागत आहे . त्यामुळे गावात बुथ दया अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकु आसा इशारा तेथील युवा नेते ज्ञानेश हलगरे आणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वरे दिला आहे . सोनवळा ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये धनगरवाडी गावाचा समावेश आहे . धनगरवाडीची लोकसंख्या ९०० तर मतदार ४०० आहेत .ऐवढी लोकसंख्या आसताना ग्रामपंचायत किंवा बुथ करत नाहीत . गेली तिन वर्ष झाली बुथ मागनी करत आसुन या कड़े प्रशासन लक्ष देत नाही . याला कंटाळून बहिष्काराचा निर्णय घेतला आहे . या पुर्वी अनेक निवेदने दिले मात्र अंमलबजावनी नाही त्यामुळे आता आगामी निवडनुकीपुर्वी गावात मतदान केंद्र निर्मीती करावे , अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे .

टिप्पण्या