खंडाळी पंचायत समिती निवडणुक प्रशांत सुधाकरराव शिंदे लढवणार.
********************************
अहमदपुर(प्रतिनिधी) जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वञीक निवडणुक, फेब्रुवारी-मार्च २०१७ चे पडघम वाजायला सुरूवात झाली.तसे पाहता आता ज्या त्या जिल्हा परिषद गटाला व ज्या त्या पंचायत समिती गणाला आरक्षण सोडत झाली.त्याच प्रमाणे लातूर जिल्ह्यातील खंडाळी जिल्हा परिषद गट व खंडाळी जिल्हा परिषद गण हा दोन्ही खुला सर्वसाधरण प्रवर्गसाठी सुटला आहे.त्यामुळे खंडाळी जिल्हा परिषद गटामधील,खंडाळी पंचायत समिती गणाची निवडणुक महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंञी व अहमदपुर-चाकूर विधानसभा मतदार संघाचे, विद्यमान लोकप्रिय आमदार, मा.श्री.विनायकरावजी पाटील साहेब यांचे खंदे समर्थक, युवा मंचाचे तालुका अध्यक्ष युवा नेते, श्री.प्रशांत सुधाकरराव शिंदे हे लढवणार आहेत.,प्रशांत शिंदे यांचा खंडाळी पंचायत समिती गणामध्ये मोठा मिञपरिवार आहे व आ.विनायकरावजी पाटील साहेबांनी केलेली विकासाची कामे केली आहेत त्या मुद्यावर श्री.प्रशांत शिंदे हे ही निवडणुक लढवणार आहेत, त्यामुळे निश्चितच आ.विनायकरावजी पाटील साहेबांची खुप मोठी ताकद, व पाठबळ प्रशांत शिंदे यांच्या पाठीमागे असणार आहे.
श्री.प्रशांत शिंदे हे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी,खंडाळी चे विद्यमान पदसिध्द सदस्य आहेत, व ते मा.विनायकरावजी पाटील युवा मंच,अहमदपुर तालुका अध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत.प्रशांत शिंदे हे नेहमी सर्वसामान्य व गोरगरीब लोकांच्या कामाला धाऊन जातात व त्यामुळे खंडाळी पंचायत समिती गणामधील सर्वसामान्य गोरगरीब लोकांची भावना की, येणारी पंचायत समिती निवडणुक ही प्रशांत शिंदे यांनी लढवूण, खंडाळी पंचायत समिती गणाचे नेतृत्व करावे अशी भावना व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे प्रशांत शिंदे ही निवडणुक लढवणार आहेत.
टिप्पण्या