मुख्य सामग्रीवर वगळा

भुमीपुत्र म्हणून काम करतो :- तहसीलदार संजय पवार

भुमीपुत्र म्हणून काम करतो :- तहसीलदार संजय पवार
* * * * * * * * * * * * * * * *
गंगाखेड { प्रतिनिधी } गंगाखेड तालुक्यातील माती कपाळावर लावून भुमीपुत्र म्हणून काम करत असल्याचे मत तहसीलदार संजय पवार यांनी गंगाखेड ग्रामीण पत्रकार संघाच्या कार्यालयाचा शुभारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगाखेड तहसीलदार संजय पवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून Dysp श्रीकांत डिसले, गटविकास अधिकारी इस्कापे हे उपस्थित होते.तहसिलदार संजय पवार पुढे बोलताना म्हणाले की गंगाखेड ग्रामीण भागातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. संविधानात राहून काम करायचे असते म्हणुन सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अधिकारी काम करत असतात मी भुमीपुत्र म्हणून जनतेच्या प्रश्नावर काम करत असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.dysp डिसले म्हणाले की अवैध धंदे 99 टक्के नाही तना 100 टक्के बंद होणार यात शंका नाही तसेच कायदा आणि सुव्यवस्था मोडणाऱ्याची गय केली जाणार नाही असे स्पष्ट केले यावेळी गंगाखेड ग्रामीण पत्रकार संघाच्या कार्यालयाचा शुभारंभ थाटात पार पडला यावेळी सुत्रसंचलन संघाचे संस्थापक अध्यक्ष रमेश कातकडे यांनी केले  तर यावेळी पत्रकार सय्यद गौस, रमेश महामुने, ज्ञानेश्वर जाधव, उद्धव चाटे, लक्ष्मण केंद्रे , सतीश मोरे, बाळासाहेब कदम, राहुल बनाटे, यजाज इनामदार आदी  बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते

टिप्पण्या