पालम (अरुणा शर्मा) पालम तालुक्यात मुख्यकार्यकारी अधिकारी *श्री सुशीलजी खोडवेकर यांनी पालम तालुक्यातील आपल्या भेटी दरम्यान शैक्षणिक बाबींचा आढावा घेतला .
प्रगत विद्यार्थी निर्मिती प्रशिक्षण सर्वप्रथम SEDT, केरवाडी येथे प्रगत विद्यार्थी निर्मिती साठी चालू असलेल्या दिनांक २५ आक्टोंबर ते २७ आक्टोंबर या प्रशिक्षणास भेट दिली . सदरील प्रशिक्षण देणारे नेदरलँड येथील ट्रेनर *Jos Bergkamp* आणि *Martin Kessels* व प्रशिक्षणार्थी चर्चा केली केली . नेदरलँड येथील शिक्षण प्रणाली बाबत चर्चा केली . तसेच प्रशिक्षणार्थी श्री संजय पाटील , सौ. तोंडारे मँडम व सौ. संगिता जाधव मँडम यांनी प्रशिक्षणा विषयी मनोगत इंग्रजी भाषेतून व्यक्त केले .यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी देखील आज इंग्रजी भाषेतूनच शिक्षकांशी संवाद साधला. मूल प्रगत करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करण्याचा मनोदय व्यक्त केला . प्रशिक्षणार्थी शिक्षकांना प्रमाण पत्रांचे वाटप करण्यात आले. सदरील प्रशिक्षणात पुर्णा तालुका *गटशिक्षणाधिकारी श्री विठ्ठल भुसारे*यांनी प्रशिक्षणार्थी शिक्षकांना मार्गदर्शन केले .प्रा.शा. खरब धानोरा ता. पालम या तालुक्यातील पहिल्या डिजिटल स्कूल चे उद् घाटन*
पालम तालुक्यातील खरब धानोरा येथील जिल्हा परिषद शाळेच्या रुपांतर डिजिटल स्कूल मध्ये झाले असून या डिजिटल शाळेचे उद् घाटन *मा. मुख्यकार्यकारी अधिकारी श्री सुशीलजी खोडवेकर (IAS)* साहेबांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना प्रथम सेवाभावी संस्थेच्या वतीने *TAB वाटप* करण्यात आलेत. तसेच *E-Learning* कक्षाचे उद् घाटन देखील करण्यात आले. यावेळी मा. मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी आपल्या मनोगतातून *स्वच्छ गाव स्वच्छ विद्यालय* ही संकल्पना रुजविण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले . गटविकास अधिकारी श्री मुंढे* यांनी तालुक्यातील शैक्षणिक प्रगती बाबतीत समाधान व्यक्त केले . शिक्षण विभागातील उपक्रम , स्वच्छ विद्यालय व प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र याबाबत तालुक्याचा आढावा *गणराज यरमळ* यांनी सादर केला . प्रथम संस्थेचे *श्री नाईक* यांनी तालुक्यातील TAB व त्यातील अभ्यासक्रम या विषयी व शैक्षणिक उपक्रमाविषयी माहिती दिली . *श्री जाधव सरांनी* आपल्या प्रास्तविकातून शाळेच्या बदलत्या रुपाची व केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली .
यावेळी मा. मुख्यकार्यकारी अधिकारी साहेबांनी शाळेतील पूर्ण उपक्रम , बोलक्या भिंती , शालेय परीसर, शाळेचे प्रयत्न , परसबाग, स्वच्छतागृह पहाणी करून ख-या अर्थाने "स्वच्छ विद्यालय" बाबत समाधान व्यक्त केले . यावेळी विद्यार्थी , ग्रामस्त, सरपंच यांच्यासह सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. जि.प.कें.प्रा.शा. शेखराजूर. ता. पालम शाळेस भेट*
जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा शेखराजूर येथील शाळेस सायंकाळी ६:३० वाजता भेट देऊन शाळेतील संगीत साहीत्य, लोक वर्गणी , शैक्षणिक उपक्रम , रंग रंगोटी, शालेय स्वच्छता, शैक्षणिक साहित्य , बोलक्या भिंती आदींची पहाणी विद्युत सुविधा नसलेल्या या शाळेत मोबाईल बॕटरीच्या प्रकाशात पहाणी करून शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले . लवकरच विद्युत पुरवठा चालू करून देण्याबाबत पुढील कार्यवाही बाबत सांगितले .विज्ञान सेंटर, केरवाडी. भेट* अगदी रात्री पण ९ वाजेपर्यंत मा. मुख्यकार्यकारी अधिकारी *श्री खोडवेकर साहेब* विज्ञान प्रयोगात , वैज्ञानिक तत्त्व समजून घेण्यात रममान झालेत. याप्रसंगी विज्ञान सेंटर ची माहिती सुर्यकांत कुलकर्णी , अजिंक्य कुलकर्णी , विष्णू जाधव , अभिजित संघई यांनी दिली .
टिप्पण्या