मुख्य सामग्रीवर वगळा

राणीसावरगाव जिल्हा परिषद निवडणूक कृष्णा दळणर लढवणार

राणीसावरगाव जिल्हा परिषद निवडणूक कृष्णा दळणर लढवणार
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * राणीसावरगाव ( प्रतिनिधी ) राणीसावरगाव जिल्हा परिषद सर्कलमधून शिवसेनेचे नेते प्रा.शिवाजीराव दळणर याचे सुपूत्र कृष्णा दळणर रिंगणात उतरणार असल्याचे खास सुत्रांनी सांगितले आहे.
सविस्तर माहिती अशी की, राणीसावरगावचा भुमीपुत्र जिल्हा परिषद सर्कलच्या सर्वागीण विकासासाठी कोणताही राजकीय पुढारी पुढे येऊ दिला नाही त्यामुळे इतरांनी फायदा घेऊन सता उपभोगली मात्र सध्या पर्याय उपलब्ध झाला आहे तोच म्हणजे शिवसेना नेते प्रा.शिवाजीराव दळणर याचे सुपूत्र कृष्णा दळणर निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.तसे पहाता राणीसावरगाव शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि प्रा.शिवाजीराव दळणर याच्या कार्यकर्त्यांची मोठी ताकद खंबीरपणे कृष्णा दळणर याच्या पाठीशी उभे राहणार यात शंका नाही .
कृष्णा दळणर रिंगणात उतरले तर नक्कीच जनता त्यांच्या पाठीशी राहील असे मत शिवसेनेचे कार्यकर्ते बोलून दाखवित आहेत.

टिप्पण्या