पांढरेवाडी गावकरी रस्त्याच्या प्रतिक्षेत
* * * * * * * * * * * * * * * *
राणीसावरगाव ( प्रतिनिधी ) राणीसावरगाव येथुन जवळच असलेल्या पांढरेवाडीला जाण्यासाठी 60 वर्षापासुन रस्ता नसल्याने गावकरी रस्त्याच्या प्रतिक्षेत आहेत .
सविस्तर माहिती अशी की स्वातंत्र्याची 60 वर्ष उलटून गेली तरी पांढरेवाडी या गावाला जाण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांना मोठा प्रश्न निर्माण झाला आहे .रस्त्यावरून जात असताना आपल्या नेत्यांना कोसतात साहेब मतदान मगयला येण्याअधी एखादा गावच्या रस्त्याने येऊन तर बघा असे म्हणतात.एखादा रूग्ण दवाखान्यात उपचार करण्यासाठी न्यायचा असेल तर वाटेतच आपघात होतात त्यामुळे रूग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. याच विषयावर गावाला रस्ता करण्यासाठी अनेक वेळा हरिश्चंद्र पांढरे यांनी निवेदने व प्रतेक्ष भेटून ही नराशा पदरी पडली आहे . रस्ता केव्हा होईल याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे
टिप्पण्या