मुख्य सामग्रीवर वगळा

बनवस येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

बनवस येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
* * * * * * * * * * * * * * * * *
रक्तदान,नेत्रदान,अवयवदान,सह बनवस भुषण पुरस्कार वितरण
* * * * * * * * * * * * * * * *
राणीसावरगाव { प्रतिनिधी } पालम तालुक्यातील मौजे बनवस येथे शिवैक्य बालासाहेब नळगिरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने दि.12 डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर माहिती अशी की पालम तालुक्यातील मौजे बनवस येथे दि.12 डिसेंबर रोजी शिवैक्य बालासाहेब नळगिरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या मध्ये रक्तदान,नेत्रदान, अवयवदान, अरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे यात बाल तपासणीसाठी डॉ.रायसोणी, डाॅ.बिसेन,दंत तपासणीसाठी डॉ.सोंळके,डॉ.साबणे, डॉ.लखोटिया,डॉ.अनंद सोंळके,डॉ.सोमवशी,डॉ.भाताब्रे आदी तज्ञ उपस्थित राहणार आहेत .या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून बालाजी पांडागळे ,अध्यक्षस्थानी मनोहरराव धोंडे, मुक्ताबाई शेळगावकर, विठ्ठल रबदाडे, नारायण शिरगावकर, सदाशिवआपा ढेले,बबिता कदम, प्रकाश लातुरे,दिपक मोस्ताळे, डॉ.सुभाष कदम, शिवप्रसाद कोरे,दयानंद कुदमुळे हे उपस्थित राहणार आहेत यावेळी मान्यवराच्या हस्ते बनवस भुषण पुरस्कार मानकरी गोविंद ढेले, डॉ.दिपक स्वामी, डॉ.विजय कोटलवार ,सनदकुमार बनवसकर,प्रा.नरसिंग कदम, पुजा बनवसकर,प्रियंका स्वामी याना सन्मानित करण्यात येणार आहे.या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन नळगिरे , पाटील यांनी केले आहे

टिप्पण्या