गुंजेगाव जिल्हा परिषद निवडणूक सौ.करूणाताई कुंडगिर लढवणार
* * * * * * * * * * * * * * * * *
राणीसावरगाव { प्रतिनिधी } गंगाखेड तालुक्यातील गुंजेगाव जिल्हा परिषद निवडणूक सौ.करूणाताई कुंडगिर(मा.जि.प.सदस्य ) या काॅग्रेस पक्षाच्या वतीने लढवणार असल्याचे खास सुत्रांनी सांगितले आहे.
सविस्तर माहिती अशी की गंगाखेड तालुक्यातील गुंजेगाव जिल्हा परिषद निवडणूक लढवावी असा कार्यकर्ते व मतदारातून बोलले जात आहे त्याचाच विचार करून निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.तसे पहाता राणीसावरगाव येथील संत गाडगेबाबा शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते त्यामुळे या परिसरात मोठय़ा प्रमाणात जनतेशी नाळ जोडली गेली आहे.आमच्यातलाच एक उमेदवार उभा राहिला आहे असे जनतेला वाटत आहे.बोथी ग्रामपंचायतीची सत्ता सौ.करूणाताई कुंडगिर यांच्या ताब्यात आहे याचा फायदा होईल यात शंका नाही.विशेष म्हणजे विकासाची दृष्टी असणारी महिला उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जाते. महासंवाद न्युज सर्वेक्षणातून समोर आले आहे की सौ.करूणाताई कुंडगिर यांनी निवडणूक लढवावी असे अनेक जनतेची मते आहेत.
टिप्पण्या