राष्ट्रीय समाज पक्षातर्फे संतोष डोणे ची उमेदवारी निश्चित !
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
राणीसावरगाव { प्रतिनिधी } जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात आले आहे .तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने संतोष डोणे याची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सविस्तर माहिती अशी की गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव जिल्हा परिषद सर्कलमधून राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद निवडणूक उमराव सानप तर पंचायत समिती निवडणूक संतोष डोणे हे रिंगणात उतरणार असल्याचे त्यांच्या खास सुत्रांनी सांगितले आहे. संतोष डोणे हे सर्व समाजातील जनतेशी संपर्क असणारा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जाते. राष्ट्रीय समाज पक्ष वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी उभी केली आहे त्याचाच फायदा त्यांना होऊ शकतो.
टिप्पण्या