पक्षाकडे तिकीटासाठी इच्छुकांचं साकडं तर नेते जाती-पातीचे राजकीय गणिते जुळवण्यात व्यस्त
* * * * * * * * * * * * * * * *
राणीसावरगाव { प्रतिनिधी } गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव जिल्हा परिषद सर्कलमधून शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काॅग्रेस, राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र राणीसावरगाव, पिंपळदरी पंचायत समिती गटातून निवडणूक लढवणारे उमेदवार तिकीट मिळण्यासाठी पक्षाच्या नेत्यांना विनंत्या करून जणू साकडंच घालत आहेत हे लक्षात घेऊन नेतेमंडळी मात्र पंचायत समितीत कोणत्या जातीकडे किती मते आहेत त्यांचा जि.प उमेदवाराला किती फायदा होईल अशी जाती-पातीची राजकीय गणिते जुळवण्यात नेते व्यस्त असल्याने सध्या तरी निवडणुकीत रंग भरला गेला नाही .राणीसावरगाव सर्कलच्या सर्वागीण विकास साधण्यासाठी एकाही उमेदवाराने आराखडा तयार केला नाही मात्र जाती-पातीच्या नावावर , पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढविणार असल्याचे दिसून येते असे असले तरी लक्ष्मीच्या जिवावर निवडणुकीत विजयी होऊ असा जनू नियमच काढला आहे या नेत्यांनी. ! राणीसावरगाव पंचायत समिती निवडणुकीत अनेक इच्छुक उमेदवार रिंगणात ऊतरणार आहेत.या निवडणुकीत निश्चितच मतदार लक्ष्मी पेक्षा अधिक महत्त्व निष्कलंकीत उमेदवारास देतील आणि निष्कलंकीत उमेदवाराच्या पारडय़ात मते टाकतील असे चित्र दिसत आहे
टिप्पण्या