रा.स.पाचे पदाधिकारी राजीनामे देणार !
राणीसावरगाव { प्रतिनिधी } जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी सुरू झाली असतानाच राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष चव्हाण सह गंगाखेड तालुका युवा अध्यक्ष बालासाहेब चव्हाण यांच्यासह त्यांचे समर्थक राजीनामे देणार असल्याचे महासंवाद न्युज शी बोलताना बालासाहेब चव्हाण यांनी सांगितले आहे.
सविस्तर माहिती अशी की गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव जिल्हा परिषद निवडणूकीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने उमेदवाररिंगणात उतरणार आहेत हे उमेदवार निवडताना विश्वासात घेतले जात नाही असा आरोप करीत पुढे बोलताना म्हणाले की झेंडा हतात घेऊन मागे फिरायचे काय असा प्रश्न जिल्हा उपाध्यक्ष संतोष चव्हाण यांनी उपस्थित केला त्याच्या सह तालुका उपाध्यक्ष संतोष चव्हाण हे राजीनामा देणार आहेत यामुळे राणीसावरगाव सर्कलच्या उमेदवारावर परिणाम होईल असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे
टिप्पण्या