जि.प व प.स निवडणूका अनं आश्वासनाची खैरात
* * * * * * * * * * * * * * * * * * *
साहेब येताना जरा रस्त्याकडं बघा
* * * * * * * * * * * * * * * * * * *
राणीसावरगाव { प्रतिनिधी } जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका जवळ आल्याने कधी न फिरकणारे पांढरपेशी नेते आता थेट जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आश्वासनाची खैरात करत आहेत.
राणीसावरगाव सर्कलच्या सर्वागीण विकासासाठी कोणताच नेता समोर येत नाही. मात्र निवडणूक आली की कोण कुठले पण लक्ष्मी घेऊन आलोय म्हटले की जिल्हा परिषद निवडणूकीत विजय आपलाच म्हणणारे कार्यकर्ते तयार असतात त्यांना गावच्या समस्या बद्दल काही देणं घेणं नसतं.याना लक्ष्मीपुत्र चालतो मात्र भुमीपुत्र चलत नाही कारण पक्षाने दिलेला माणूस आहे म्हणून काम करत आहेत ठिक आहे पक्षाशी एकनिष्ठ रहावे पण विजयी होणारे एकनिंष्ठ का राहत नाहीत ? निवडणूक झाल्यानंतर पाच वर्षे पूर्ण झाली की मग तुमची आठवण येते त्या नेत्यांना असे का ? असो . . . आपल्या मातीचे रून आपल्यावर आहे ते फेडण्याची वेळ आली आहे त्याच बरोबर लक्ष्मी पुत्राना धडा शिकवण्याची जबाबदारी राणीसावरगावकर म्हणुन पार पाडायची आहे
काही महाभाग जाती-पातीचे राजकीय गणिते करून निवडणूक लढवणार असल्याचे सांगतात.पण आपण मी राणीसावरगावकर म्हणुन निवडणूकीत मतदानातून लादलेले नेते घरी पाठवायचे आहेत हे लक्षात घेऊन सुजाण मतदारांनी ठरवले तर एकत्र येऊन परिवर्तन घडवून आणू शकतात.आई श्री रेणुकामाता सर्वांना सदबुद्धी देवो आणि राणीसावरगाव मधील एक भुमीपुत्र उभा राहिला तर गाव विकासाचा विजयीरथ कोणी रोखू शकणार नाही.......
एक मतदार
टिप्पण्या