गुंजेगाव जिल्हा परिषद सर्कलमधून सौ.करूणाताई कुंडगीर यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
गंगाखेड { प्रतिनिधी } गंगाखेड तालुक्यातील गुंजेगाव जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी निश्चित झाल्याने या गणाचा सर्वागीण विकास साधण्यासाठी सौ.करूणाताई कुंडगीर या प्रयत्नशील व कटीबद्ध असून विकास आराखडा घेऊन त्या नेतृत्व करत आहेत विषेश करुन महिला नेतृत्व असले तरी मतदारसंघातील सामान्य कार्यकर्त्यांपासून ते सर्वसामान्य जनतेत परिचित आहेत. मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर होताच मतदारातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. त्यानी समाजाची सु:ख-दुखे जवळून पाहिली आहेत त्या दृष्टीने या मतदारसंघाचा सर्वागीण विकास साधण्याची क्षमता त्याच्यात आहे.
टिप्पण्या