मुख्य सामग्रीवर वगळा

विद्यार्थांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी” श्री.छत्रपती शिवाजी प्रायमरी इंग्लिश स्कूल व उच्च प्राथमिक-माध्यमिक विद्यालय ग्रामीण भागासाठी सक्षम पर्याय.

श्री छत्रपती शिवाजी बाल कला मोहत्सव-२०१७ दि.१८/०२/२०१७ शनिवार रात्री संपन्न झाला.
प्रती वर्षा प्रमाणे याही वर्षी श्री.छत्रपती शिवाजी प्रायमरी इंग्लिश स्कूल व उच्च प्राथमिक-माध्यमिक विद्यालय राणीसावरगाव यांच्या वतीने  श्री छत्रपती शिवाजी बाल कला मोहत्सव-२०१७ चे आयोजन केले होते, या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून चित्रपट अभिनेते श्री  संजय प्रभू कांबळे पुणे व ची.अक्षय खरात,ची. शुशील कांबळे - झेंडा स्वाभिमानाचा या चित्रपटातील अभिनेत्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले,तर या कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी   श्री मारोतीअप्पा कोरे होते. हि शाळा प्रती वर्षी सामाजिक,शेक्षणिक,राजकीय, सांस्कृतिक,साहित्यिक क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्रात उलेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा शाल श्रीफळ सन्मान चिन्ह व पुरस्काराचे प्रमाणपत्र देऊन गौरव करीत असते.त्यात श्री विठ्ठल रनबावरे- परभणी, डॉ.नंदकिशोर पाटील-अमरावती,श्री संतोष राउत-मुंबई, साहित्यिक अनिल स्वामी- राणीसावरगाव.ग्रामीण कवी आत्माराम जाधव,ग्रामीण साहित्यिक कै.हरिभाऊ जाधव-राणीसावरगाव. आदर्श शिक्षक वसंतराव गळकाटू,श्री अंधुरे गणेश सर {चीन} सौ.डॉ.मीनाताई परशुराम शिंदे,सौ.डॉ. जयश्रीताई होळे, तसेच  राणीसावरगाव.येथील NDA परीक्षेस पास झालेला विद्यार्थी शंतनू देसाई कदम व शास्त्रज्ञची परीक्षा पास झालेला विद्यार्थी ची.अनुज नारायण जाधव यांचा वेगवेगळे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.व नंतर सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरवात झाली त्यात शाळेतील विद्यार्थांनी हिंदी मराठी चित्रपटातील गीते,कोळी गीते,आदिवासी गीते,तसेच देशभक्तीपर गीतावर सुंदर असे नृत्य केले व स्त्रीबृहन हत्या, ग्राम स्वछता अभियान, राष्ट्रीय एकात्मता आणि सर्व धर्म सहिष्णुता या विषयावर आधारित गीते व नाटिका सादर करण्यात आल्या. शाळेतील सर्व बाल कलाकारांनी अतिशय चांगला अभिनय सादर केला.या कार्यक्रमास किमान दहा हजाराच्या जवळपास श्रोत्यांची उपस्थिती होती.यात  पोलीसस्टेशनचे ए.पि.आय श्री श्याम आपेट साहेब व पी.एस.आय चोधरी साहेब व त्यांच्या सर्व टीमने अतिशय शांततेत कार्यक्रम पार पाडण्यासाठी सहकार्य केल्यामुळे समस्त गावकऱ्याच्या वतीने पोलीस प्रशासन व शाळेचे कोतूक होत आहे.
        हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सचिव.श्री शिवसांब कोरे, संचालक शिवप्रसाद कोरे,ओंकार कोरे व मुख्याध्यापक सौ.सीतापती मैडम, श्री व्यंकट कदम सर.प्रा.उद्धव चव्हाण सर, संतोष चलोदे सर, स्वामी मैडम, वेदा मैडम,मेकाले मैडम, हाके सर अक्षय शेटे सर व सर्व शिक्षक शिक्षेकेतर कर्मचारी  वृंद  यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन बळीराम पुटेवाड व भीमाशंकर ढाले सर यांनी केले तर आभार राजूरकर सर यांनी मांडले.

टिप्पण्या