मुख्य सामग्रीवर वगळा

राणीसावरगावकरांना बाल कलाकांरानी केले मंत्रमुग्ध

राणीसावरगावकरांना बाल कलाकांरानी केले मंत्रमुग्ध
* * * * * * * * * * * * * * * * * राणीसावरगाव { प्रतिनिधी } गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव जिल्हा परिषद प्रशालेत प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी शालिय कला महोत्सव 2017 चे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून पंचायत समिती सदस्य दत्तराव जाधव, अध्यक्षस्थानी सरपंच होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ए.पी.आय शाम अपेट, औंकार आंधळे, धनंजय जाधव, सुरेश चव्हाण,प्रा.रमेश महामुने, मधुकर जाधव, सोमनाथ कुदमुळे, बसलिंग चलोदे, मैनू तांबोळी, नारायण जाधव, आत्माराम जाधव, ज्ञानेश्वर जाधव, शेख मुनिर , आदी उपस्थित होते. यावेळी बाल कलाकांराना प्रोत्साहन देण्यासाठी सुरेश चव्हाण यांनी प्रथम क्रमांक मिळवणारास 3000 रू तर द्वितीय क्रमांक मिळवणारास 2000 रू आणि तृतीय क्रमांक मिळवणारास 1000 रूपये बक्षिसे देण्यात आली आहे . बाल कलाकांरानी वेगवेगळ्या गाण्यावर नृत्य सादर करून रसिकांची दाद मिळविली काही कलाकांरानी तर राणीसावरगावकरांना मंत्रमुग्ध केले.

टिप्पण्या