मुख्य सामग्रीवर वगळा

जळकोट येथे लेखी स्पर्धा

युवा सम्राट मित्र मंडळ महाराष्ट्र,जळकोट च्या वतीने छत्रपती  शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवाजी महाराजांच्या जीवन चरीत्रावर लेखी स्पर्धा परिक्षा घेण्यात आली होती.या परिक्षेमध्ये गट (अ) ८वी ते १०वी व गट (ब) ५ वी ते ७वी अशी दोन गट पाडुन परिक्षा  घेण्यात आली होती..या परिक्षेला ९० विद्यार्थी बसले होते. तरी  या परिक्षेत गट अ मध्ये प्रथम बक्षिस निलेश धुळशेठे तर दुसरे बक्षिस धनुरे भक्ती व ब गटात प्रथम  टाकळे कृष्णा  व दुसरे बक्षिस सोनटक्के अभिषेक यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक चापटे सर तर प्रमुख पाहुने किरन पवार, गवळे सर(कल्याणी गॅस एजन्सी)माधव वाघमारे, अर्जुन वाघमारे (नगरसेवक) सिध्दार्थ सुर्यवंशी, हर्षवर्धन गायकवाड (प्रदेशाध्यक्ष) हे होते. तर किरन  पवार सरांनी सखोल असे  मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष गडकरे ता. अध्यक्ष युवा सम्राट मित्रमंडळ जळकोट व बुध्दभुषण गायकवाड शहराध्यक्ष युवा सम्राट मित्रमंडळ जळकोट,श्रीकांत नामवाड, आकाश शिंदे , आकाश कदम, संतोष ढवळे, प्रशांत गायकवाड ,सुरज वाघमारे, परमेश्वर गायकवाड,प्रफुल गायकवाड आदीनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या