मुख्य सामग्रीवर वगळा

गंगाखेड मधील इस्तेमा ये आम ची सुरवात

गंगाखेडात दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी गंगाखेड शहरात भव्य आणि दिव्य इस्तेमा ये आम ची सुरुवात झाली असुन हा इस्तेमा परभणी व हिंगोली जिल्ह्याचा असुन नवीन इदगाह मैदान गंगाखेड येथे होणार आहे.
येणाऱ्या इस्तेमा ये आम साठी भाविकांची मोठी गर्दी लक्षात ठेवून गंगाखेड येथील युवा तरुणांनी खूप मोठ्या प्रमाणात भव्य आणि दिव्य अश्या प्रकारे जय्यत तय्यारी केली असुन, या कार्यक्रमात मोठ मोठे मौलाना पण आपले विचार मांडणार आहेत. हा कार्यक्रम म्हणजे सर्व लोकांना सोबत घेऊन चालणारा व कुराण आणि हादीस या पवित्र ग्रंथाच्या आधारे आपणा समोर मांडून लोकांच्या मनातील गैर समज दुर करून सर्वांना शांततेचा संदेश पण देतील. या इस्तेमासाठी परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यातील भावीक लाखोच्या संख्येने उपस्थित राहतील.
१० एकर जागेत भव्य अश्या प्रकारे मंडप उभारण्यात आले आहे. येणाऱ्या भाविकांसाठी परभणी जिल्ह्यातील मुस्लीम बांधवांनी या दोन दिवसीय इस्तेमासाठी जेवण्याची, पाण्याची, इस्तेमासाठी आलेल्या लोकांना राहण्याची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली असुन या इस्तेमात येणाऱ्या वाहनांनसाठी ४ ठिकाणी पार्किंग ची व्यवस्था करण्यात आली आहे.
तरी लाखो च्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहावे असे इस्तेमा ये आम गंगाखेड तर्फे कडळविन्यात आले आहे.

टिप्पण्या