मुख्य सामग्रीवर वगळा

लोकप्रतिनिधीनी हे काय केलय ?

राणीसावरगावातील रस्ते कधी होणार ?
* * * * * * * * * * * * * * * * *
राणीसावरगाव { प्रतिनिधी } गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव जिल्हा परिषद निवडणूक तोंडावर आल्याने रस्ते बनण्यासाठी मोजमाप झाले त्यानंतर खडी येऊन पडली आणि निवडणूक होऊनही रस्ते झाले नाही मात्र टाकण्यात आलेल्या खडीमुळे नागरिकांना चालता येत नाही त्यामुळे रस्ते कधी करायचे ते करा मात्र 4 महिन्यापासून टाकण्यात आलेली खडी हटवून नागरिकांना होणारा त्रास कमी करावा असे बोलले जात आहे
सर्कलच्या सर्वागीण विकासासाठी लोकप्रतिनिधीनी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून विकास कामे केली पाहिजेत मात्र यासर्कलचे उलटे झाले आहे अनेक ठिकाणी खडी टाकून काम करत असल्याचे दिसून येते मात्र चार महिने झाले तरी काम होत नाही त्यामुळे रस्त्यावरून चालता येत नाही लहान मुले खेळताना पडून दुखापत होत आहे, गाड्या घेऊन ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे त्यामुळे रस्ता  तयार करायचा तेव्हा करा मात्र हा होणारा त्रास कमी करावा काही ठिकाणी सिमेंट रस्ते करण्यात आले आहेत तर राहिलेले रस्ते कधी करणार असा सवाल जनता  करत आहे.लोकप्रतिनिधी हे विकास कामे करत आहेत ठिक आहे पण हा जनतेला होणारा त्रास कमी होईल का ? यासाठीच जनतेने निवडून दिले आहे का ? यावर लोकप्रतिनिधीनी विचार करून राहिलेले रस्त्याचे काम सुरू करावे हि मागणी जोर धरू लागली आहे

टिप्पण्या