मुख्य सामग्रीवर वगळा

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे चांगल्या रस्त्याचे वाटोळे..!

राणीसावरगाव  (प्रतिनिधी) गंगाखेड तालुक्यातील महत्वाचा मार्ग असलेल्या गंगाखेड  अहमदपूर राज्य महामार्ग क्रमांक २१७ वर ईसाद पासुन पिंपळदरी रोड पर्यंत रस्त्याच्या डांबरीकरण असलेल्या भागाला लागुनच मजबुतीकरण रस्त्याचे ओएफसी केबलसाठी कंत्राटदाराकडुन जेसीबी मशीनच्या सहायाने खोदकाम करण्यात येत आहे. खोदकाम करताना नाल्यातुन निघालेली माती रोडवर टाकुन वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या महामार्गाच्या लगत असलेल्या किमान साठ फुट अंतरावर रस्त्याच्या बाजुने पाणी वाहुन नेणाऱ्या नाल्यातुन या केबलचे काम करण्याची परवानगी असतानाही प्रत्यक्षात मात्र वाहन खाली उतरण्यासाठी मजबुतीकरण केलेल्या साईडपट्टयाचे खोदकाम केल्यामुळे बाजुचा रस्ता भुसभुशीत होऊन रस्त्यावरील पाणी मुरण्याची शक्यता आहे. खोदकाम करताना जेसीबी मशीनमुळे रस्त्यांच्या खालुन करण्यात आलेल्या पाईपलाईनचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबतीत सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र डोळेझाक करित असल्यामुळे अशा पद्धतीने रस्ताच खोदून केबल गाडण्याचे पूर्णत्वाकडे जात आहे. या गलथान कारभाराची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी लोकांकडून करण्यात येत आहे.

याबाबतीत गंगाखेड येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागातील शाखाअभियंता श्री फड यांच्याशी विचारणा केली असता मला या बाबतीत माहीती घ्यावी लागेल . आम्ही रस्त्याच्या बाजुने जाणाऱ्या नाल्याच्या पलीकडे शेतातुन नालीचे खोदकाम करण्यासाठी परवानगी दिली असुन साईड पट्यावर खोदकाम करणे चुकीचे आहे.अशी माहीती दिली.

टिप्पण्या