राणीसावरगाव,(प्रतिनिधी), आधुनिक काळात आपले पाल्य स्पर्धेत टिकून राहण्यासाठी पालकांकडून विशेष प्रयत्न केले जाता आहेत. शिक्षण क्षेत्रासह सगळीकडेच सध्या इंग्रजी भाषेला महत्त्व प्राप्त झाले असून आपल्या पाल्याला इंग्लिश माध्यमाच्या खाजगी शाळांचे शुल्क भरून इंग्रजी भाषेतून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरचे शिक्षण देण्यासाठी पालकांचा कल दिसून येत आहे. परंतु जुन्या शिक्षण संस्थेसह जि.प.च्या शाळांमधील शिक्षण पद्धतीत बदल झालेला नसल्यामुळे इंग्लिश माध्यमाच्या नविन पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळांचे ग्रामीण भागात देखील स्पर्धफु सुरू झाली आहे. शासनाच्या नवीन धोरणानुसार नवीन उभारण्यात आलेल्या शैक्षणिक संस्थाना शासकीय अनुदान मिळत नसुन या संस्थांना स्वताच्या स्वयं अनुदानातुन व्यवस्थापन करावे लागत असल्यामुळे संस्थाचालक पालकांकडून मोठ्या प्रमाणात डोनेशनच्या नावाने फीस आकारून पालकांकडून अर्थिक लुट करीत आहेत.
कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता शहरातील बहुतांश भागात प्लेग्रुपच्या नावाने पालकांच्या लुटीचा खेळ सुरू केला आहे. शिक्षणाच्या नावाखाली दुकाने थाटणाऱ्या काही शाळांना ‘प्लेग्रुप, नर्सरी, ज्युनिअर केजी आणि सिनिअर केजी’त बक्कळ पैसा मिळतो अर्थात तो मिळविला जातो. .
अनेक शाळांमध्ये प्रवेशासाठी पालकांना आधी ‘डोनेशन’चा स्पीड ब्रेकर पार करावा लागतो. ते दिलेच तर प्रवेश सुकर होतो. काही शाळा तर प्रवेशाअगोदर डोनेशन तर घेतातच शिवाय पालक आणि पाल्यांच्या मुलाखतीही घेतात. प्री-प्रायमरीत या उद्योगातून मागील काही वर्षात नोटांचा वर्षावच होत असल्याने सध्या गल्लोगल्ली, परिसरातील मिळेल त्या भागात, जागेत गोंडस नावाखाली प्लेग्रुप, नर्सरी, केजी अशा शेकडो शाळांचे पेव फुटले आहे. यावर शिक्षण विभागाचे फारसे नियंत्रण नाही. सीबीएसई कडुन मान्यताप्राप्त संस्था नसताना देखील पॅटर्न च्या नावाने पालकांना आकर्षित केले जात आहे.शाळेची नोंदणी व संच मान्यता याकडे शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
खासगी इंग्रजी शाळांचे मोठे पीक आलेले असताना गेल्या काही वर्षात प्लेग्रुप, नर्सरी, केजीचे शिक्षण देणाऱ्या शाळांची परिसरातील गावागावात लाट आलेली आहे.प्लेग्रुप सुरु करण्यासाठी खास नियोजन, खास इमारतीच्या फंद्यात संबंधित पडत नाहीत. छोटासा प्लॉट, पाच-सहा दुकाने असलेले ठिकाण, देवस्थानाच्या मालकीच्या जागांचा वापर करण्यात येत आहे. यामध्ये भक्तीनिवास भक्तासाठी नाही तर करापोटी भाड्याने दिले गेले आहे .संस्थानची जागा भाड्याने देता येत आसेलही कदाचीत मात्र भक्ताने रहायचे कुठे हा प्रश्नच महत्त्वाचा आहे .मुख्य रस्त्यावरुन जाताना काही शैक्षणिक संस्थांचे जाहीरातीचे बॅनर्सवर सीबीएसई पॅटर्नची जाहिरात करणाऱ्यां शाळेत अभ्यासक्रम मात्र महाराष्ट्र शासनाचा अभ्यासला जातोय. जाहीरात करणारे फलक मात्र पालकांना आकर्षित करत आहेत.
टिप्पण्या