विध्यार्थी प्रिय शिक्षक बालासाहेब तिर्थकर बालासाहेब किशनराव तिर्थकर गुरुजींचा जन्म गरीब, शेतकरी कटुंबातला आई-वडिलांनी हाडाची काड करुन लेकरांना शिक्षणाची दार उघडी करुन दिली. शाळा करीत करीत आई-वडिलांना शेती कामात मदत केल्यामुळे गुरुजींच्या अंगी मेहनत आणिचिकाटी हे गुण बालवयातच रुजले.स्वतःला कितीही काबाड कष्ट करावे लागले तरी माझ्या मुलांनी शाळा न सोडता शिक्षणघेतले पाहिजे ही आईची तळमळ फारच विलक्षणहोती. पण दुर्दैवाने गुरुजी १० वीची परीक्षा देत असतांनाच आईचं छत्र हरवलं. गुरुजींच्याा जीवनातला मायेचा झरा कायमचा आटला. नियतीने गुरुजींच्याा एकाचवेळी दोन-दोन परीक्षा घेतल्याच तरीही न डगमगता आईचं स्वप्न साकार करण्या साठी पुढील शिक्षणासाठी उस्मानाबादला जावून पदवीका हस्तगत केली. त्यांचे जेष्ठा बंधु अनंतराव तिर्थकर हेही हाडाचे गुरुजी होते आईच्या वात्सल्याची जराशीही उणीव या भावाने कधी जाणवू दिली नाही. प्रेम,जिव्हा्ळा,संवेदना या सर्व गोष्टी त्यांच्या कडुनच शिकायला मिळाल्या. ‘पंढरीची वारीI आहे माझे घरी’ या उक्तीनुसार पुर्वापार चालत आलेल्या सांप्रादायिक वारसा अतिशय सात्विकतेने,निष्ठेने आणि माेठया भक्तीभावाने पुढे चालवला. त्यांच्या् सहवासातील सहका-यांना त्यांच्या शितलतेचा अनुभव पाहायला मिळाला. गुरुजींनी आपल्याव सेवेची सुरुवात भगतसिंग विद्यालया पासुन केली पण जि.प. च्याय आदेशाने त्या ठिकाणचा राजीनामा द्यावा लागला. अतिशय तुटपुंज्या पगारावर एक शिक्षकी शाळेवर त्यां नी सेवा केली डोंग्रज,व्ह टी नं.०२, विळेगाव,व्होगटाळा,बेलगाव,सताळा आणि आताशिंदगी बु. असा त्यांनी प्रवास केला. गुरुजींनी आपल्या सेवेच्या काळात पालकां पेक्षाही बालकांशी नातं अधिक घट्ट केलं व्हािवे लहानाहुनी लहान म्हुणत गुरुजी लेकरांचे कधी झाले ते कोणालाच कळत नसे.ग्रामीण भागातल्या् गरीब व शेतकरी कष्टकरी दिन दलितांच्या मुलांना घडविण्याकसाठी स्वरतःला वाहुन घेतले होते असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गुरुजींनी कोणत्यााही गावी श्नोकरी केली पण पुर्ण वेळ शाळा आणि सदैव बालकांचा लळा या ब्रिदवाक्याेपासुन कधी फारकत घेतली नाही म्हणुन मुख्याेध्यापक पदभार या बाबींपासुन ते नेहमीदुरच राहिले.अतिशय नम्र प्रेमक स्वभाव संयमी आणि सात्विक वृत्तीे साधी राहणी उच्च विचार सरणी आणि मधुर वाणी या अंगभुत गुणांनी सर्वांनाचा आपलसं करुन टाकलं. बदली हा प्रशासकीय सेवेचा अविभाज्यं भाग आहे पण गुरुजींची बदली झाली की, ती रद्द करण्याणसाठी पालकांची आंदोलन व्हायची यातुन त्यांच्या कार्याची प्रचिती येते. प्रा.शा.विळेगाव येथे रुजु झाले अल्पावधीतच शाळेची नंदादीप शाळा,अॅक्टिव्ह स्कुल म्हणुन निवड झाली.प्रा.शा.बेलगाव ही शाळा तालुक्याचतील ८ वी पर्यंतची पहिली डिजीटल शाळा म्हणुन नावारुपास आली.कें.प्रा.शा.सताळा येथे रुजु होऊन तालुक्याीतील पहिल्या ISO मानांकन प्राप्त शाळेत सेवा करण्यााची संधी मिळाली. मुख्याध्यापक पदोन्नतीस वारंवार नकार देऊनही शेवटि ती माळ गळ्यात पडलीच आणि प्रा.शा.शिंदगी बु या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणुन काम करनेचीसंधी त्यांना मिळाली. त्याही संधीच त्यांनी सोणंच केलं. अशा शिक्षण क्षेत्रातील उल्लेखणिय कामाची पावती म्हणुन त्यांना गुरुगौरव पुरस्कार , आदर्श शिक्षक पुरस्का्र, अॅक्टिव इंग्लीश शिक्षक पुरस्कार, अशा विविध पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला. एवढ्या सिद्धी प्राप्त असुनही प्रसिद्धी पासुन गुरुजींनी कायमचे दुरचराहणे पसंत केले. गुरुजी हा शब्द ज्यांच्यामुळे सर्वांना अधिक जवळचा वाटतो ते आदरणीय बालासाहेब तिर्थकर गुरुजी दि.३० जुन २०१७ रोजी सेवानिवृत्तहोत आहेत त्या बद्दल केलेला शब्दाप्रपंच....गुरुजींना भावी आरोग्यमय आयुष्यास मनस्वी शुभेच्छा !!!!
टिप्पण्या