मुख्य सामग्रीवर वगळा

स्वरातीम विद्यापीठातही घोळ चाले...प्राध्यापकावर अन्याय....ऑनलाइन महासंवाद

नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात काही प्राध्यापकावर अन्याय केला जात आहे हे थांबायला हवे नाही तर इतर विद्यापीठासारखे स्वरातीम विद्यापीठातही घोळ चालतोय का ? हे सांगायलाच नको. . . . नेमकं झालय काय पाहू मागच्या दारातून भरती केलेल्या उमेदवारांना त्याच दारातून बाहेर काढा, असे सुस्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने मागेच दिलेले असताना शिक्षण क्षेत्राच्या पंढरीत, म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने सात कंत्राटी प्राध्यापकांना विद्यापीठांतील वेगवेगळ्या संकुलांमध्ये कायम स्वरुपात समायोजित करण्याचा घाट प्रशासनाने घातला असून या बेकायदेशीर प्रस्तावाविरुद्ध मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.
या विद्यापीठाच्या वेगवेगळ्या संकुलांतील काही खुल्या व वेगवेगळ्या प्रवर्गाच्या राखीव जागा विद्यापीठाने मागील 5 वर्षांपासून भरल्या नाहीत. पण आता पाच संकुलासाठी मंजूर असलेल्या जागा अन्य संकुलात वर्ग करुन पाच वर्षांसाठी कंत्राटी तत्त्वावर नेमलेल्या सात प्राध्यापकांना कायम करण्याबाबतचा प्रस्ताव विद्यापीठाने मंत्रालयाला पाठविला. या प्रकाराकडे नांदेड विभागाच्या शिक्षण सहसंचालकांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला पत्र पाठवून खुलासा मागितला आहे.
स्वारातीम’ विद्यापीठाने गेल्या 8 मार्च 2017 रोजी वरील प्रस्ताव (जा.क्र.आस्था/3/2016-17/6118) उच्च शिक्षण विभागाकडे याबाबतचा प्रस्ताव पाठविला. त्यावर शासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.  परंतु राजकीय व प्रशासकीय दबाव आणून हा प्रस्ताव मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या प्रस्तावानुसार विद्यापीठातील डॉ.तुकाराम कल्याणकर (औषध निर्माण शास्त्रसंकुल), गजानन मुधोळकर (वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र संकुल), मोहनीश महामुने, महेश श्यामसुंदर दरक, संतोष चौहाण, मकरंद वांगीकर चौघेही (संगणकशास्त्र संकुल) आणि अशोक गिनगिने (शिक्षणशास्त्र संकुल ) हे प्राध्यापक मागील चार-पाच वर्षांपासून विद्यापीठात कंत्राटी तत्त्वावर अध्यापनाचे कार्य करीत आहेत. त्यांची सेवा कायम करण्यासाठी अन्य संकुलातील मंजूर आरक्षित पदे वरील प्राध्यापकांशी संबंधित संकुलात वर्ग करुन त्यांचे थेट समायोजन करण्याची मागणी विद्यापीठाने केली आहे. परंतु या अजब व अनाकलनीय प्रकारामुळे त्या-त्या संकुलांच्या अन्य पात्र उमेदवारांवर अन्याय होत असल्यामुळे भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.संतुक हंबर्डे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.
यातील गंभीर बाब म्हणजे डॉ.अशोक गिनगिने हे अनुसूचीत जमाती या प्रवर्गातील आहेत. याच प्रवर्गाचा उल्लेख करुन त्यांनी सन 2002 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाकडून कनिष्ठ संशोधन विद्यावेतन प्राप्‍त केले होते. ते सध्या शिक्षणशास्त्र संकुलात कार्यरत आहेत. त्यांना कायमस्वरुपी समायोजित करण्यासाठी माध्यमशास्त्र संकुलात (व्हीजेएनटी) प्रवर्गासाठी मंजूर असलेली साहाय्यक प्राध्यापकपदाची जागा अनेक वर्षांपासून रिक्‍त ठेवल्यानंतर आता हे पद शिक्षणशास्त्र संकुलात वर्ग करुन गिनगिने यांना लाभ देण्याचा प्रयत्न सुरु आहे आणि त्यांच्या नावापुढे (व्हीजेएनटी) प्रवर्गातील असल्याचे दर्शविण्यात आले आहे. या गंभीर प्रकाराविरुद्ध माध्यमशास्त्र संकुलातील कंत्राटी प्राध्यापक डॉ.कैलास यादव यांनी स्वतंत्रपणे मुख्यमंत्र्यांसह सर्व संबंधितांकडे तक्रार केली आहे. 
विद्यापीठात यापूर्वी मागील 22 वर्षांत असा प्रकार कधीच झाला नव्हता. पण या नव्या प्रयोगामुळे विद्यापीठाच्या भाषा, वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलातील सहयोगी व साहाय्यक प्राध्यापकांच्या प्रत्येकी दोन जागांवर अतिक्रमण करुन महेश दरक व अन्य तीन उमेदवारांच्याबाबतीत विशेष औदार्य दाखविले जात आहे. तर शिक्षणशास्त्र संकुलातील प्राध्यापकपदावर तुकाराम कल्याणकर यांच्यामुळे अतिक्रमण होत आहे. 

--------------------------------------------- - - - - - - - -

सहसंचालक खताळ यांचे विद्यापीठाला पत्र

विद्यापीठाच्या या प्रस्तावाविरुद्ध तक्रार प्राप्‍त झाल्यानंतर उच्चशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ.एम.एन.खताळ यांनी विद्यापीठाच्या कुलसचिवांना 3 जुलै रोजी पत्र पाठविले. तक्रारकर्त्याचे म्हणणे नमूद करुन हा प्रस्ताव कोणत्या शासन नियमाप्रमाणे सादर करण्यात आला, याबाबतचा खुलासा तात्काळ सादर करण्याचे आदेश त्यांनी या पत्राद्वारे दिले आहेत. 

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
विविध संघटना अदोलन उभारणार...!
एखाद्या प्राध्यापकावर अन्याय केला जात असेल तर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले जाते.  विविध संघटनांनी एकत्र येऊन कागदपत्रे जुळवनी सुरू केले आहे

टिप्पण्या

Crime Repoter म्हणाले…
डॉ.संतुक रावजी आगे बढो हम तुम्हारे साथ है।।।।