परभणी (प्रतिनिधी)
शिक्षणा क्षेञाचे बाजारीकरण होत चालले असुन संस्थाचालकांच्या भ्रष्ट कारभाराची लख्तरे उडविणारी घटना उघडकीस आली असुन मागील सहा महिन्याच्या वेतनाची रक्कम काढण्यासाठी सहशिक्षकाकडे 20% रक्कम द्यावी अशी मागणी कामेल उर्दु हायस्कूल या शिक्षण संस्थेच्या मुख्याध्यापीका शहाना बेगम शे. गुलजार व संस्थेचे सचिव तथा लिपीक मो.मुश्ताक अहेमद आणि सेवक बळीराम मस्के यांनी केली होती
सदरील 65000/-रुपये स्विकारतांना आज शनिवार दि.01 जुलै रोजी तिघांनाही लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. सविस्तर वृत्त असे की कामेल उर्दु हायस्कूल या संस्थेतिल एका सहशिक्षकास त्याचे मागील थकीत पाच महिन्याचे वेतन येणे बाकी होते या संधीचा फायदा घेऊन मुख्याध्यापीका शहाना बेगम शे.गुलजार व संस्थेचे सचिव तथा लिपीक मो.मुश्ताक अहेमद आणी सेवक पदावर कार्यरत बळीराम मस्के या तिघांनी मिळणाऱ्या थकीत रक्कमेतील 20% रक्कम म्हणजेच 65000/- ( पासष्ट हजार ) रुपये दिलेतरच थकीत वेतन काढले जाईल असे सांगीतले वारंवार मागणी करूनही वेतनाची रक्कम अदा केली जात नसल्याने ञस्त झालेल्या सहशिक्षकाने शेवटी वेतन काढण्यासाठी 65 हजार एवढी रक्कम आणावी तरी कुठून ? प्रश्नार्थक मुद्रेत वावरणाऱ्या तक्रारदाराने अखेर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचा दरवाजा ठोठावला त्यांनी या विभागाकडे केलेल्या तक्रारीत हे तिघेजण 65 हजार रुपयें मागत आहे. त्यापैकी आज 20 हजाराची रक्कम सेवक बळीराम मस्के याच्याकडे देण्यास सांगीतले आहे या तक्रारीवरून सचिव मो. मुश्ताक अहेमद मो.अली यांच्या घरी पंचासमक्ष लाचेची रक्कम स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले. या तिघांच्या विरोधात नवा मोंढा ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती. दरम्यान सापळा यशस्वी करण्यासाठी नांदेडचे लाचलूचपत विभागाचे प्रभारी पो.अ.संजय लाटकर, पो.उप अधिक्षक एन.एम.बेंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.अनिल गव्हाणकर ,दिनकर गावंडे, लक्ष्मण मुरकुटे, भारती, लक्ष्मण उपलंचवार, सचिन गुरसुडकर,शेख मुखीद तसेच श्रीकांत कदम, शिवाजी बोडले, सारीका टेहरे,बोके रमेश चौधरी यांनी कामगीरी यश्स्वीरित्या पार पाडली. तपास पो.नि.अनिल गव्हाणकर करीत आहे.
टिप्पण्या