मुख्य सामग्रीवर वगळा

मुक बधीर आकाशला हवी आहे शिक्षणासाठी आर्थिक मदत..!

परभणी/जिल्ह्यातील सेलु तालुक्यातील मौ.वालुर गावचा रहिवासी असलेला 19 वर्षीय मुक-बधिर विद्यार्थी आकाश अशोकराव बोराडे या विद्यार्थाने दहावीच्या परिक्षेत 73.80% गुण मिळवून आपल्या बुध्दीमत्तेचा परिचय संपूर्ण जिल्ह्याला करुन दिला परभणी येथील कांचन ञ्यंबकराव कञुवार कर्णबधिर विद्यालयात शिकणाऱ्या वालुरच्या या मुकबधीर कर्णबधीर विद्यार्थ्याची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असुन आकाशचे वडील अशोकराव हे बांधकाम मजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात मुकबधीर असतांनाही शिक्षणात अत्यंत हुशार असलेल्या आकाशला पुढील शिक्षण देण्याची ऐपत नसलेल्या अशोकराव बोराडे यांना आकाशचे पुढील शिक्षण थांबवण्याची वेळ आली आहे जन्मजात अपंग अपंग असतांनाही आकाश इतर मुलांच्या तुलनेत शिक्षणात अत्यंत हुशार व बुध्दीमान आहे पुढील शिक्षण शिकून इंजिनियर होण्याचा दृढ निर्धार व्यक्त करणाऱ्या आकाश बोराडेला आज गरज आहे आर्थिक मदतीची,मुकबधीर विद्यार्थी आकाशला पुढील शिक्षण पुर्ण करण्यासाठी दानशुर व्यक्तींकडून आर्थिक मदतीची गरज निर्माण झाली आहे कारण आकाशच्या वडीलांकडे त्याच्या महाविद्यालय प्रवेशाची फिस भरण्यासाठी ही पैसे नसल्याने गुणवंत आकाशला शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ आली आहे कृपया त्याला शिक्षणासाठी सरळ हस्ते मदत करा व त्याचे शैक्षणिक भविष्य उध्वस्त होण्यापासून वाचवा गुणवंत मुकबधीर विद्यार्थी आकाश अशोक बोराडे याचा बँक अॉफ महाराष्ट्र या बँकेतील खाते क्रमांक 60260421457 IFC Code MAHB 0000124 हा असुन आर्थिक परिस्थिती अत्यंत कमकुवत असल्याने अपंगत्वावर आणी गरीब परिस्थीतीवर मात करुन शिक्षण शिकणाऱ्या या गुणवंत विद्यार्थी आकाशला पुढील शिक्षणासाठी आवश्यकता आहे आपल्या आर्थिक मदतीची कारण इंजिनियर होऊन आकाशला करायची आहे देश सेवा...

टिप्पण्या