राणीसावरगाव सरपंच पदासाठी गुप्तगू बैठका
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
राणीसावरगाव ( प्रतिनिधी )
राणीसावरगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीत राणीसावरगाव विकास आघाडीकडून सरपंचपदी प्रा.पी.एल राठोड यांची वर्णी लागली.त्यावेळी अडीच वर्षे प्रा.राठोड त्यानंतर अडीच वर्षे दुसरा सरपंच निवड करण्यात येणार असल्याने आता तो कालावधी लोटला आहे. त्यामुळे आता सरपंचपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. सध्या सरपंच बदलाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे यामध्ये अनेक पुढारी आप-आपले राजकीय गणिते जुळवत आहेत.यात जे पुढारी राजकीय आखाडय़ातू बाद झाले होते ते आता पुन्हा सक्रिय होताना दिसत आहेत आणि त्यांच्या समर्थकासह सदस्यांच्या गुप्तगू बैठका घेऊन यावेळी सरपंच आपलाच असावा अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.तशी अपेक्षा ठेवणे गैर नाही .कारण सत्ताधारी पॅनलमध्ये पडलेली फुट हिच त्याच्यासाठी फायद्याची ठरणार आहे यात शंका नाही. मात्र राणीसावरगाव विकास आघाडीचे पॅनल प्रमुख सय्यद अल्ताफ, मधुकर जाधव असे होऊ देतील का ? हे पहाणे गरजेचे आहे.
मात्र सध्या तरी गाव परिसरात पार्ट्या व गुप्तगू बैठकामध्ये वेगवेगळी मोर्चे बांधणी करण्यात येत आहे सरपंचपदी कोण ?
यावर पुन्हा स्पेशल रिपोर्ट देणार आहोत ...पाच वर्षे दोन सरपंच विकासाचं काय ?
टिप्पण्या