राणीसावरगाव येथे राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा स्थापन करण्यात यावी अशी एकमुखी मागणी गेल्या दहा वर्षांपासून गावकऱ्यांसह आजूबाजूच्या परिसरातील गावातील नागरिक, व्यापारी, कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत असून देखील शासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे लवकरात लवकर स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या शाखेची स्थापना करण्यात यावी अशी मागणी करित वेळप्रसंगी जन अंदोलन छेडण्याचा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गंगाखेड तालुका उपाध्यक्ष सय्यद अल्ताफ सय्यद अकबर यांनी दिला आहे.
मागील दहा वर्षांपासून वेळोवेळी अनेकदा सय्यद अल्ताफ यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने मुंबई, विभागीय मुख्य प्रबंधक बीड, जिल्हाधिकारी परभणी, अग्रणी बॅकेकडे लेखी निवेदन सादर करून पाठपुरावा करण्यात आला आहे. गावकऱ्यांकडुन लेखी निवेदने देउन सुमारे चाळीस ते पन्नास गावांचे ठराव, व्यापारउद्योगातील व्यावसायिकांचे मागणी पत्र, परिसरातील गावातील अर्थिक लेखाजोखा सादर केला आहे. बॅकेसाठी अवश्यक जागा उपलब्ध करून देऊन सुद्धा प्रशासनाकडून कुठलाही निर्णय घेण्यात येत नसल्यामुळेच परिसरातील शेतकरीवर्ग,कर्मचारी व पेन्शनर्स लोकांचे हाल होत आहेत. या प्रश्नावर जनआंदोलन छेडण्यासाठी नुकतीच पंचायत समिती सदस्य श्री दतराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी मधुकरराव जाधव, ओंकार आंधळे, सरपंच प्रा.पी.एल.राठोड, उपसरपंच भुषण गळाकाटु, दगडुआप्पा धुळे, महारूद्र बेंबळगे, प्रा.प्रदिप जाधव, डाॅ.स्वामी, डाॅ.पी.एम. शिंदे, धनंजय जाधव, रमेश कुलकर्णी, सोमनाथ कुदमुळे, बाळासाहेब भिमनपल्लेवार, मैनुद्दीन तांबोळी,बसलिंग चलोदे, संजय रायबोले,रमेश महामुने, नारायणराव जाधव, सुरेश चव्हाण, एकनाथ आडे, माधव राठोड, बालासाहेब कवडे, मुजमील तांबोळी, समाधान जाधव, बाबुभाई गुत्तेदार, शेख कादर, अनिल कांबळे, प्रदिप जाधव, अरूणाप्पा मंगलगे, विश्वनाथ चव्हाण, उत्तम जाधव, दिनेश चलोदे, बाळु वाघमारे, अंकुश साळवे व ईतर गावकऱ्यां उपस्थितीत बैठक संपन्न झाली.लवकरात लवकर शाखा स्थापन करण्यात यावी अशी एकमुखी करण्यात येत आहे.
टिप्पण्या