खंडाळा (प्रतिनिधी) –तुषार पवार
वैजापूर तालुक्यातील भिंगी येथील राहत्या घराला रॉकेलची बत्ती पडल्याने आग लागली यामध्येघरातील रोख रक्कम ४५ हजार रूपये, चार शेळ्या, सर्व शैक्षणिक कागदपत्रासह घरातील साहित्य जळून खाक झाले. याबाबत अधिक माहिती अशी कि अनिता सुरेशयेलिंजे राहणार भिंगी वय ४० वर्ष ह्या आपल्या मुलांसह येथे राहतात. आज पहाटे तीन ते साडेतीन दरम्यान घरातील रॉकेलची बत्ती पडल्याने घर बांधण्यासाठीपाहुण्याकडून आणलेले ४५ हजार तसेच चार शेळ्या,कपाट, पलंग, गादया व सर्व शैक्षणिक कागदपत्रे व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले गावकर्यानीताबडतोब पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने घरातील गॅस सिलिंडर पर्यंत आग पोहचली नाही.नसता मोठा अनर्थ घडला असता घटनेचीमाहिती मिळताच भिंगी चे सरपंच भागूबाई शेवाळे,उपसरपंच बाळनाथ शिंदे यांनी भेट दिली. तलाठी काथार यांनी पंचनामा करण्याचा आदेश दिला आहे.
प्रतिक्रिया –
* * * * * * *
मी विधवा असुन मोलमजुरी करून माझा चरितार्थ चालवते शासनाने मला मदत करून नुकसान भरपाई द्यावी
अनिता सुरेश येलिंजे
माझे सर्व शैक्षणिक कागदपत्रे जळून खाक झाली आहे आता काय करावे हे मला समजत नाही
सिध्दार्थ सुरेश येलिंजे
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
शासना कडून आवश्यक मदत करण्यासाठी पाठपुरावा करू तसेच मी वैयक्तिक संसारोपयोगी साहित्य घेऊन देऊ.
भागूबाई शेवाळे, सरपंच भिंगी
टिप्पण्या