मुख्य सामग्रीवर वगळा

अहमदपूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल. !

(आॅनलाईन प्रतिनिधी अरविंद पौळ ):- अहमदपूर तालुक्यातील खंडाळी परीसरात जवळपास सत्तर ते ऐंशी शेतकऱ्यांचे दीडशे ते दोनशे बॅग 'नुजीवीडु' मल्लीका या वानाचे कापूस बियाणे अल्प प्रमाणात उगवले असून परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
      शेतकऱ्यांनी अहमदपूर,खंडाळी येथील कृषी सेवा केंद्रातून खरेदी केलेल्या चारशे पन्नास ग्राम वजन असलेल्या कापूस बॅगची किंमत सातशे सत्तर आहे.पंधरा ते विस दिवसापूर्वी टोकण पद्धतीने लागवड केलेल्या बियाणांची उगवण चार पाच दिवसात अपेक्षीत होते.आज पर्यंत उगवण न झाल्याने हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांनी जिल्हा परिषद सदस्य माधव जाधव यांच्या सहकार्याने पंचायत समिती येथे तोंडी तक्रार केली. यानुसार पंचायत समिती कृषी विभागाने प्राथमिक पहाणी केली आहे.
-----------------------------------

प्राथमिक पहाणी केली असता कापूस बियाणे अंदाजे तिस ते पस्तीस टक्के एवढे उगवले आसून पुढील पहाणीत तालुकास्तरीय बियाणे उगवण तक्रार समिती मार्फत पंचनामे करण्यात येतील व संबंधित शेतकर्यांना दिले जातील ...एम.व्ही.कुंभार,कृषी अधिकारी,पंचायत समिती कृषी विभाग अहमदपूर.

-------------------------------
अहमदपूर येथील कृषी दुकानातून सात बॅग "नुजीवीडु" मल्लीका वानाचे कापूस बियाणांची पाच एकर जमीनीवर नऊ जुन रोजी लागवड केली.आज तन व बियाणे उगवण लक्षात आल्यावर पंचायत समिती येथे तोंडी तक्रार केली.लवकरच अधिकृत पंचनामा व्हावा व नुकसान भरपाई मिळावी..... रामराव उद्धव पौळ,शेतकरी.रा.खंडाळी ता.अहमदपूर.
--------------------
खंडाळी येथे कापूस उगवण अल्प झाल्याने पहाणी करताना खंडाळी पंचायत समिती सदस्य माधव जाधव, अहमदपूर पंचायत समिती कृषी अधिकारी एम.व्ही.कुंभार व शेतकरी.

टिप्पण्या