परभणी जिल्ह्य़ातील भांबरी शिवारात अॉपरेशन शासकीय स्वस्त धान्य धडक कार्यवाही मोहीम फत्ते ]परभणी/शासनाने सर्वसामान्य गोर-गरीब जनतेसाठी विविध योजने अंतर्गत वितरीत करण्यासाठी पुरवठा विभागा मार्फतपरवाना धारक स्वस्त धान्य दुकानदारांना दिलेला गहु तांदुळाचा साठा जिल्ह्यातल्या जितुर तालुक्यातील भांबरी शिवारात मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या साठवण करुनकाळ्याबाजारात विक्री करण्यासाठी ठेवला असल्याची माहिती प्रभारी पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांना समजताच त्यांनी तातडीने सापळा रचून तब्बल 660 कट्टे जप्त करुन दोन आरोपीतांना अटक केली आहेजिल्ह्यात सर्वञ राशन माफियांनी धुमाकूळ घातल्याचे दिसत असून अश्याच पध्दतीने भांबरी शिवारात गोर गरीबांच्या तोंडचा घास पळवणाऱ्या राशन माफियांनी शासकीय स्वस्त धान्य गहू तांदळाचा साठा पोत्यांची अदलाबदल शासकीय पोत्यातील धान्यसाठा अन्नपूर्णा तांदळालेबल लावून काळ्याबाजारात विक्री करण्यासाठी साठवल्याची माहिती एका खास खबऱ्या कडून प्रभारी पो.अ.पानसरे यांना मिळाल्यानंतर शहानिशा करण्यासाठी त्यांनी तातडीने पोउपनि.सनगले,पोहेकाँ.नरेश सिरसकर,तिप्पलवाड,श्रीकांत लांडगे,दिनेश स्वामी,शेख शहाबाज,राठौड,सय्यद मुस्तफा आदींच्या पथकाने वेशांतर करुन मिळालेल्या टिप प्रमाणे जागेची पाहाणी केली माहीती सत्य असल्याचे निदर्शनास आल्याने तात्काळ प्रभारी पो.अ.पानसरे यांनी तहसिलदार जिंतुर,सपोनि सुदर्शन भांगे,यांच्याशी संपर्क साधून सदरील ठिकाणी छापा मारुन कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने पथकाने महसुल विभागाचे सुभाष विठ्ठलराव सरोदे,नायब तहसिलदार आसे व सनगले यांच्या नेतृत्वात असणारे सर्व पोलीस महसुलविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी भांबरी शिवारात घटनास्थानी दि.15 जुलै 2017 रोजी राञी 09-45 वाजताच्या सुमारास छापा मारला यावेळी अंधाराचा फायदा घेऊन सरकारी तांदळाचे पांढरे पोते रिकामे करुन त्यातील सरकारी धान्य माल हा अन्नपूर्णा नावाचे लेबल असलेल्या पोत्यात भरलेला आढळून आला त्याच बरोबर बारदाना पोते शिवण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली मशीन तसेच शासकीय धान्याचे रिकामे पोते सुध्दा आढळून आले पथकाने जप्त केलेल्या शासकीय मालामध्ये अन्नपूर्णा लेबल लावूनसरकारी तांदूळ भरलेले 440 कट्टे प्रत्येकी 50 किलो प्रमाणे एकूण 220 क्विंटल तांदूळ,गव्हाचे 100 कि.ग्रा.क्षमतेच्या बारदाणा पोत्यामध्ये 100 पोते असे 100 क्विंटल गहू सर्व जप्त करण्यात आलेल्या शासकीय स्वस्त धान्याची किंमत 358950/-रुपयें आहे.
टिप्पण्या