वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ संचालित, कृषी महाविद्यालय खंडाळा ता.वैजापूर येथील सातव्या सत्रातील कृषीदूतांनी कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत वैजापूर तालुक्यातील पोखरी येथे कृषीदिना निमित्त वृक्ष दिंडी काढून वृक्षारोपण केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे वैजापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी कवाड देवी मॅडम,अध्यक्ष स्थानी सरपंच दिलीप जाधव,उपसरपंच प्रभाकर ठुबे,पो.पा.विठ्ठल ठुबे,जि.प.शाळेचे मुख्याध्यापक साळुंके सर व शिक्षक वृंद शालेय समितीचे अध्यक्ष संदीप ठुबे,तंटा मुक्तीचे अध्यक्ष रावसाहेब आप्पा,राज्य परिषद सदस्य बाळकृष्ण ठुबे,यांची कार्यक्रमास उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील बाल गोपाळांनी वृक्ष दिंडी काढून करण्यात आली. वृक्ष दिंडी दरम्यान संपूर्ण परिसर बाळ गोपाळांच्या घोष वाक्यांनी दुम दुमला होता.यावेळी संपूर्ण गावात वृक्षांचे महत्व पटवून देण्यात आले.तसेच या कार्यक्रमात वैजापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी कवाड देवी मॅडम यांनी वृक्ष रोपण करून बाल गोपालांशी संवाद साधला तसेच सरपंच,उपसरपंच,पोलीस पाटील,शाळेचे मुख्याध्यापक यांनी हि वृक्षा रोपण केले.या कार्यक्रम प्रसंगी कृषीदूतांनी संपूर्ण गावाचा आराखडा रांगोळी व्दारे काढून यामध्ये गावातील देउळ,शाळा,ग्रामपंचायत कार्यालय,दवाखाना,अंगणवाडी,गावाला पाणीपुरवठा करणारी टाकी,लोक वस्ती व वृक्ष दिंडीचा मार्ग दाखवण्यात आला.
वृक्ष दिंडीचा कार्यक्रम संपल्यानंतर कृषीदूत विशाल बोचरे यांनी सेंद्रिय शेती व त्यांचे फायदे तसेच रासायनिक खतांचा कामी वापर करून सेंद्रिय खाताव्दारे उत्पादन वाढविण्यासाठी चे मार्गदर्शन केले.रासायनिक खतांचा शरीरावर होणारे आजार जमिनीचा दिवसेंदिवस घटतजाणारा दर्जा व त्यावरील प्रतिबंध याविषयी माहिती दिली.तसेच कृषीदूत अजय लोखंडे यांनी सूक्ष्म अन्न द्रव्यांचे व्यवस्थापन,कृषीदूत महेश जाधव यांनी बंधिस्त शेळी पालन,कृषीदूत सुजित शेळके यांनी मुरघास बनविण्याची प्रक्रिया व त्यासाठी लागणारा खर्च तसेच मुरघासाचे दुग्ध व्यवसायात असणारे महत्व याविषयी माहिती दिली.
कार्याक्रम यशस्वी होण्यासाठी कृषीदूत गणेश सपकाळ,नवनाथ सानप,ज्ञानेश्वर पवार,सागर सोळुंके,महेश जाधव,विशाल बोचरे,अजय लोखंडे,सुजित शेळके,पल्लवी विधाते,राधिका बोरसे यांचे महत्वाचे योगदान होते.
कृषीदुतानी वृक्ष दिंडी व्दारे गावकर्यांना कृषीदिन व वृक्ष रोपणाचे महत्व समजावून सांगितले.प्रभाकर ठुबे,उपसरपंच पोखरी
कृषीदूतांनी आम्हाला सेंद्रिय शेती,मुरघास बनविण्याची प्रक्रिया,सूक्ष्म अन्न द्रव्यांचे व्यवस्थापन या विषयी मोलाचे मार्गदर्शन केले.विठ्ठल ठुबे,पोलीस पाटील पोखरी
टिप्पण्या