जालना / प्रतिनिधी- साक्षर भारत योजना हि महाराष्ट्र शासन बंद करण्याचा विचार करीत असुन या योजनेतून लाखो लोकांना साक्षर करण्याचे काम आहे. हि योजना बंद न करता तिला मुदतवाढ मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य साक्षर भारत संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येत आहे. साक्षर भारत योजने अंतर्गत विविध मागण्यासाठी शुक्रवार दि. 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजता अंबड चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. संघटनेच्या प्रमुख मागण्यात साक्षर भारत योजने अंतर्गत जालना जिल्ह्यामध्ये सर्वेक्षणानुसार 15 वर्षापुढील निरक्षरांची संख्या 183254 ऐवजी होती. आजपर्यंत प्रेरकांनी 13 परिक्षेच्या माध्यमातुन 130654 नवसाक्षरांना परिक्षेत बसविले आहे. उर्वरित 50600 नवसाक्षर होण्यासाठी किमान दोन तीन वर्षाचा कालावधी लागणार आहे. या योजनेमध्ये जिल्ह्यामध्ये 1562 प्रेरक, 12 समन्वयक कार्यरत आहेत. या अभियानाची केंद्र सरकारने मुदत दि. 30 सप्टेंबर 2017 रोजी संपविण्यात येत आहे. ती मुदत वाढविण्यात यावी तिला आणखी सात वर्षे मुदतवाढ देण्यात यावी अशी शिफारस केंद्र सरकारकडे करावी . प्रेरक यांचे 28 महिन्यांचे मानधन थकित असुन ते तात्काळ देण्यात यावे, यांचा अनुभव पाहुन अंशकालीन म्हणुन सामावुन घेण्यात यावे, साक्षर भारत कार्यक्रम अंतर्गत काम करणारे मोठया प्रमाणात पदवीधर आहेत साक्षरता उद्दिष्ट पुर्ण होताच हे अभियान बंद करणार आहे. म्हणुन या अभियानाअंतर्गत काम करणार्या शासनाच्या इतर खात्यातील रिक्त जागेवर प्रथम प्राधान्य देण्यात यावे व त्यांचे समायोजन करण्यात यावे. प्रेरक यांचे मानधन 2000 असुन त्याला वाढवुन 7000 रूपये करण्यात यावा, जिल्ह्यामध्ये सुरू होत असलेल्या समकक्षता अभियानामध्ये निवड करण्यात यावी.
टिप्पण्या