खंडाळा (प्रतिनिधी)-तुषार पवार
राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेस पात्र असलेल्या शेतकऱ्याची यादी त्वरित देण्यात यावी या मागण्यासाठी वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे जिल्हा मध्यवर्ती बँके समोर शिवसेनेच्या वतीने ढोल वाजवत आंदोलन करण्यात आले. यावेळी वैजापूर तालुक्याचे माजी आमदार आर.एम.वाणी साहेब यांच्या उपस्थित बुधवारी दि.१३ जुलै रोजी ढोल वाजवत आंदोलन करण्यात आले.
सध्या शेतकऱ्याच्या कर्जमाफी बाबत भाजप सरकाने बनवाबनवी केली आहे.यात शेतकऱ्याची फसवणूक झाली आहे.यामुळे शिवसेना आज रस्त्यावर उतरून प्रत्येक जिल्हा बँकेसमोर ढोल बजाओ आंदोलन करत आहे.कर्जमाफी शेतकऱ्यांची यादी बँकेने जाहीर करावी अशी मागणीही माजी आमदार वाणी साहेब यांनी केली.
याप्रसंगी उपतालुका प्रमुख मोहन साळवे,अरुण होल,युवा सेना शहरप्रमुख अमीर अली,प्रशांत शिंदे,सतीश बागुल,माजी जि.प.सदस्य प्रकाश शिंदे,गोरखनाथ शिंदे,बाळासाहेब शिंदे,रामभाऊ त्रिभुवन,विजय मगर,पल्लू पवार,बाळासाहेब जानराव,अरविंद पवार,मुकेश पवार,संजय पवार,ताराचंद वेळजकर,रहीम बागवान,राजेंद्र मगर,रमेश मगर,दिग्विजय पवार,नवनाथ सोनवणे,भागवत घोडेकर,ओमकार त्रिभुवन,भीमराव शिंदे,रमेश शिंदे,रमेश कदम,वसंत मगर,दत्तू मगर,राजू पवार,कैलास म्हस्के,राजेश मुंगी,अरविंद शेवाळे आदि सह खंडाळा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
टिप्पण्या