खंडाळा (प्रतिनिधी)-मुरलिधर थोरात
वैजापूर तालुक्यातील खंडाळा ते सावतावाडी या सहा किमी रस्त्याचे काम सन २००४ मध्ये करण्यात आले होते. पण आज या सहा किमी रस्त्याची अशी दुरवस्था झाली आहे की नागरिकांना पाई चालणे पण कठीण झाले आहे. तसेच सावतावाडी परिसरात १ ली ते ५ वी. पर्यंत शाळा आहे. पण या चिमुकल्यांना शाळेत येन्या-जाण्यासाठी नदी ओलांडून यावे लागते. व ६ वी पासून पुढे शिक्षण घेण्यासाठी सावतावाडी परिसरातील नदी ओलांडून मुलांना खंडाळा गावात यावे लागते.
या परीसरात एक मोठे धरण आहे ते गेल्या वर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे फुल भरून सांडव्यातून पाणी निघून परिसरात असलेली नदी फुल भरल्याने सावतावाडी परिसरातील नागरिकाचे खंडाळा गावाशी चार दिवस संपर्क तुटला होता. या नदीतील रस्त्याचे काम पुन्हा पावसाळा सुरु होणार आहे तरी सुद्धा झाले नाही. हा रस्ता पूर्णतः खराब झाला आहे. याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधीनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असून या रस्त्यावर प्रवास करताना जीव मुठीत घेऊन जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
खराब झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करणे अथवा रस्त्यावरील असलेले खड्डे बुजवणे हि संबंधित विभागाची जबाबदारी आहे. मात्र या विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने त्याचा परिणाम वाहनधारकांना भोगण्याची वेळ आली आहे. अनेक ठिकाणी तर खोल खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. या सर्व खड्ड्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना हा रस्ता मृत्यूला निमंत्रण देत असल्याच भास होत असून पश्चातापाशिवाय दुसरे काहीही करता येत नाही. असे वाटते केवळ मतांसाठी या परिसरातील जनतेचा वापर करून घ्यायचा काय? असा सवाल ग्रामस्थ व युवा मतदार करत आहे. या रस्त्याकडे संबंधित विभाग, राजकीय नेतेमंडळीनी लक्ष देवून या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
गेल्या वर्षी जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने सावतावाडी परिसरातील नदीला पूर आल्याने सावतावाडी व खंडाळा गावाचा चार दिवस संपर्क तुटला होता. पुन्हा पावसाळा सुरु होणार तरी याकडे प्रशासनासह, लोकप्रतिनिधी यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे
संजय श्रावण पवार, नागरिक खंडाळा
रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. लवकरात लवकर जर प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी रस्त्याचे व नदीतील पुलाचे काम केले नाही तर आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीवर आम्ही नागरिक बहिष्कार टाकू.असा इशारा संतोष मुरलिधर गाडेकर, युवसेना सर्कल प्रमुख यांनी सांगितले.
खंडाळा ते सावतावाडी सहा किमी रस्त्यावर एक ते दीड हजार लोकसंख्या असून या रस्त्याचा उपयोग बिलोणी,भारम,अंदरसूल,मार्गे येवला जाण्यासाठी बहुसंख्य नागरिक उपयोग करतात. पण या रस्त्याची अत्यंत दूर अवस्था झाली आहे. तरी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी दाखल घ्यावे.
टिप्पण्या