मुख्य सामग्रीवर वगळा

राणीसावरगावात महिलांनी केला देव-देवतांना जलभिषेक

राणीसावरगावात पावसासाठी महिलांनी केला देव-देवतांना जलभिषेक
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
राणीसावरगाव ( प्रतिनिधी ) येथील शेत शिवार पावसा अभावी पिकांनी माना टाकल्या तर काही पिके करपत आहेत यासाठी यापुर्वी ग्रामस्थानी हनुमान मंदिरात पावसासाठी हनुमंताची अराधना केली परंतू पाऊस पडला नाही याचे गांभीर्य लक्षात घेऊन मराठा गल्लीतील महिलांनी आज दि 11 ऑगस्ट रोजी डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन वाजत गाजत एक किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरावरील मुळपिठ देवीस जलभिषेक गोवर्धन पुजा , महाआरती, यानंतर महादेव मंदिर , नगरेश्वर मंदिरातील देव-देवतांना जलभिषेक आदी विधी करण्यात आल्या यावेळी वनमाला जाधव, सुमनताई जाधव, प्रभावती आक्का , निलाताई जाधव, लक्ष्मी जाधव , सुभद्रा जाधव , इंदूबाई जाधव , मुक्ताबाई शिंदे , कांताबाई जाधव , हरिबाई  जाधव , किरण जाधव , संगीता जाधव , जोशनाताई कदम, आदी महिलांनी सहभाग घेतला होता. यासाठी पुरूषवर्ग बापूराव जाधव , विष्णु जाधव, परसराम जाधव, दत्ता श्रीरंग जाधव यांच्या पुढाकाराने अभिषेक करण्यात आला आहे.

टिप्पण्या