मुख्य सामग्रीवर वगळा

गवळी समाजातील गुणवंताचा सत्कार. ...ऑनलाइन डाॅ.कैलाश यादव

गवळी समाजातील गुणवंताचा सत्कार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
प्रज्ञा जागृती मिशनच्या सत्कार कार्यक्रमास गवळी समाज मोठ्या संख्येने उपस्थित
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
नांदेड ( प्रतिनिधी ) प्रज्ञा जागृती मिशन नांदेड आयोजित गवळी समाजातील गुणवंत, प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा सत्कार दि. 19 ऑगस्ट रोजी मारवाडी धर्मशाळेत रात्री 8 वा. मा.आ. प्रताप पाटील चिखलीकर, माजी. आ. ओमप्रकाश पोकर्णा, सहयोग सेवाभावी संस्थेचे संचालक संतुकराव हंबर्डे, व्यापारी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, निवृत्त सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे, बिशन यादव व भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा डॉ. शितल भालके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
नांदेड शहरातील अहिर गवळी, गोल्लेवार गवळी, कृष्णागवळी समाजातील गुणवंत व प्रज्ञावंत विद्यार्थी तसेच नविन कौशल्य पात्र करून समाजाला वेगळी दिशा प्रदान करणार्‍या मान्यवरांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला. सरस्वती पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रज्ञा जागृती मिशनचे अध्यक्ष भानुदास यादव यांनी प्रास्ताविकात संस्थेची माहिती उपस्थितांना दिली. त्यानंतर बिशन यादव यांनी आपल्या शेरो-शायरानी उपस्थितांची मने जिंकली संस्थेबाबत आपल्या भावना व्यक्त करतांना किशोर यादव यांनी प्रजामी आजवरचा इतिहास सर्वासमोर मांडला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणुन लाभलेले आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी गवळी समाजाची भावी पिढी उज्वल भविष्य घेवून पुढे आल्याचे सांगितले आणि एक आमदार या नात्याने गवळी समाजाला येणार्‍या कोणत्याही शैक्षणिक, राजकीय, सामाजिक अडचणीसाठी मी सदैव तत्पर असल्याची ग्वाही दिली. व्यापारी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी आर्थिकरित्या कमकुवत घटकांना आर्थिक मदत करण्याची सुचना देवून त्यात मदत करण्याची घोषणाही याप्रसंगी केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संतुकराव हंबर्डे यांनी अत्यंत दिलखूलासपणे उपस्थितांशी संवाद साधला आपल्या विविधांगी भाषणात मार्गदर्शनासोबत अनेक रंजक किस्से सांगुन त्यांनी सभागृहात उपस्थित युवकांची मने जिंकली माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी गुणवंताचे कौतुक करत त्यांना राजाश्रय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच श्यामसुंदरजी शिंदे यांनी यशाची त्रिसुचीसांगत शिक्षणाबरोबर आरोग्याची ही काळजी द्यावी असे सांगून युवक-युवतींनी नवमाध्यमाचा सिमित आणि योग्य वापर केल्याने त्याचाही शैक्षणिक वापर आपणास करता येतो असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे यशस्वी सुत्रसंचालन डॉ. कैलाश यादव यांनी तर आभार गगन यादव यांनी मानले. कार्यक्रमांच्या यशस्वितेसाठी प्रभुलालजी भातावाले, तुलजाराम बागड्या यादव, नरसिंग मंडले, गणेशलाल भातावाले, धिरज यादव, बिरबल यादव, दीपक जाफ्राबादी, तुलजाराम पहेलवान, ईश्र्वर (कालु) यादव, सुमित यादव, अमोल यादव, आदींनी परिश्रम घेतले. या प्रसंगी नगरसेवक तुलजेश यादव, स. दिलीपसिंग सोढी, स.राजेंद्र पुजारी, गिरधारीलाल सिध्दीवाले, अशोक पाटील धनेगावकर, दिक्षा अकॅडमीचे लक्ष्मीशंकर यादव, बजरंग चौधरी, सौ. रेणूका यादव, अनिता यादव, सुनिता यादव, डॉ. किरण मंडले, ज्योती भगत आदी जण उपस्थित होते.

टिप्पण्या