मुख्य सामग्रीवर वगळा

बापाचाच अल्पवयीन मुलीवर बलात्कार..

बुलडाणा(प्रतिनिधी)
बापाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून बाप लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासल्याची संतापजनक घटना जळगाव जामोद तालुक्यातील बोराळा बुद्रुक येथे उघडकीस आली आहे. बापाच्या अत्याचारास बळी पडलेली पीडित मुलगी गर्भवती आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.बोराळा येथील एका महिलेचे मुक्ताईनगर तालुक्यातील तालखेड येथील अशोक नामक व्यक्तीशी दुसरे लग्न झाले होते. या महिलेला पहिल्या पतीपासून एक मुलगी असून ती अल्पवयीन आहे. लग्नानंतर तिघेही तालखेड येथेच राहायचे. मात्र काही महिन्यांपासून ते बोराळा येथे राहण्यासाठी आले होते. आठ ते दहा महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना सावत्र पित्याने तिच्यावर बलात्कार केला. याची वाच्यता केल्यास आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिल्याने पीडित मुलगी घाबरली व ही बाब तिने कुणालाच सांगितली नाही. याचाच फायदा घेत आरोपी तिच्यावर वारंवार अत्याचार करतच राहिला. परंतु त्या मुलीची प्रकृती बिघडल्याने तिच्या आईने तिला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तिला गर्भधारणा झाली असल्याचे सांगितले. हे ऐकून मुलीच्या आईला धक्काच बसला त्यामुळे तिने जळगाव जामोद पोलीस ठाण्यात नराधम बापाविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

टिप्पण्या